जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचगावचा आढावा
By Admin | Updated: July 2, 2015 03:19 IST2015-07-02T03:19:36+5:302015-07-02T03:19:36+5:30
संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत उमरेड तालुक्यातील पाचगाव हे गाव केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचगावचा आढावा
गडकरींनी घेतले गाव दत्तक : ४ जुलै रोजी शुभारंभ
नागपूर : संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत उमरेड तालुक्यातील पाचगाव हे गाव केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतले आहे. या निमित्ताने येत्या ४ जुलै रोजी पाचगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व इमारत बंधकामाचे भूमिपूजन नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि खा. कृपाल तुमाने यांच्या हस्ते होणार आहे. या विकास कामांचा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी बुधवारी आढावा घेतला.
ग्रामपंचायत भवनात झालेल्या या बैठकीस उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू, सरपंच पुण्यशीला मेश्राम, खंडविकास अधिकारी दयाराम राठोड व इतर अधिकारी उपस्थित होते. येत्या ४ जुलै रोजी शुभारंभ व भूमिपूजन कार्यक्रमात हायस्कूल खोल्या, रस्ते, कोल्हापुरी बंधारा दुरुस्ती, रुग्णवाहिका, शौचालय बांधकाम, व्यायाम शाळा साहित्य, क्रीडांगण, ई-वाचनालय, शेतकरी भवन, फ्री-वायफाय, विद्युत जोडणी, समाजभवन, विविध योजनांचे कार्ड वाटप, पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकाम या विकास कामांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
अवैध गौण खनिज उत्खननाविरुद्ध धडक मोहीम
जिल्हा प्रशासनातर्फे बुधवारी नागपूर जिल्ह्यातील चौदाही तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व संबंधित कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.