नियम डावलून ट्रायसिकलचे वाटप ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:08 IST2020-12-25T04:08:41+5:302020-12-25T04:08:41+5:30
नागपूर : समाजकल्याण विभागाकडून दिव्यांगांना करण्यात आलेले ट्रायसिकलचे वाटप नियमबाह्यरीत्या झाले असून काही सदस्यांनी त्यावर आपले नाव लिहिल्याची चर्चा ...

नियम डावलून ट्रायसिकलचे वाटप ?
नागपूर : समाजकल्याण विभागाकडून दिव्यांगांना करण्यात आलेले ट्रायसिकलचे वाटप नियमबाह्यरीत्या झाले असून काही सदस्यांनी त्यावर आपले नाव लिहिल्याची चर्चा आहे.
समाजकल्याण विभागाकडून वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. दिव्यांगांना ट्रायसिकलचे वाटप करण्यात आले. समाजकल्याण विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ट्रायसिकल देण्याबाबत काही निकष निश्चित करण्यात आले आहे. यानुसार ५० वर्षापेक्षा वयाच्या व्यक्तीला हे देण्यात येते. अपंगत्वाची टक्केवारीही निश्चित करण्यात आली आहे. निश्चित टक्केवारीपेक्षा कमी अपंगत्व असल्यास साहित्य देण्यात येत नाही. संबंधित लाभार्थ्याची वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्यात येते. शासनाची योजना असल्याने वितरित करण्यात येणाऱ्या साहित्यावर सदस्याचे नावसुद्धा लिहिता येत नाही. परंतु ५० वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीस ही ट्रायसिकल दिल्याची व त्यावर काही सदस्यांनी आपले नाव लिहिल्याची जिल्हा परिषदेत चर्चा आहे.