आराेग्य उपकेंद्राला सॅनिटायझर डिस्पेन्सर मशिनचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:07 IST2021-05-29T04:07:49+5:302021-05-29T04:07:49+5:30
काेंढाळी : ग्रामीण भागात काेराेना संक्रमण वाढत आहे. काेराेना पासून नागरिकांसह आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा बचाव व्हावा, यासाठी काटाेल व ...

आराेग्य उपकेंद्राला सॅनिटायझर डिस्पेन्सर मशिनचे वितरण
काेंढाळी : ग्रामीण भागात काेराेना संक्रमण वाढत आहे. काेराेना पासून नागरिकांसह आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा बचाव व्हावा, यासाठी काटाेल व नरखेड तालुक्यातील सात प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या १८ उपकेंद्रांना प्रत्येकी एक सॅनिटायझर डिस्पेन्सर मशीन देण्यात आली.
या मशीन पांजरा (काटे), गरमसूर, मेंढेपठार (बाजार), रिधोरा यासह इतर उपकेंद्रांना देण्यात आल्या. रिधाेरा येथे आयाेजित कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, पंचायत समिती सदस्य संजय डांगोरे, जयंत टालाटुले, नितीन ठवळे, प्रशांत खंते, आकाश गजबे, बंडू राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. शशांक व्यवहारे, आरोग्य अधिकारी डाॅ. हर्षवर्धन मानेकर, सरपंच दुर्गा चिखले, सरपंच विजू सरवरे, उपसरपंच राजू चरडे, संजय सावरकर, प्रशांत पवार, मोती राठोड, रुपेश बुरडकर आदी उपस्थित होते.