रेल्वेत फिट इंडिया फ्रीडम रन पुरस्काराचे वितरण ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:12 IST2021-01-03T04:12:06+5:302021-01-03T04:12:06+5:30

नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात फिट इंडिया फ्रीडम रन अभियानांतर्गत डिव्हिजनल स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने पुरस्कार वितरण करण्यात आले. ...

Distribution of Railway Fit India Freedom Run Award () | रेल्वेत फिट इंडिया फ्रीडम रन पुरस्काराचे वितरण ()

रेल्वेत फिट इंडिया फ्रीडम रन पुरस्काराचे वितरण ()

नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात फिट इंडिया फ्रीडम रन अभियानांतर्गत डिव्हिजनल स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने पुरस्कार वितरण करण्यात आले. ‘डीआरएम’ कार्यालयात झालेल्या या समारंभात विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे यांनी नव्या वर्षात स्वस्थ राहून दुसऱ्यांनाही स्वस्थ राहण्यासाठी प्रेरित करण्याचा संकल्प घेण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी अभियानांतर्गत नियमितरीत्या सायकलिंग, रनिंग, वॉकिंग आणि योगा करणाऱ्या रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. यात वरिष्ठ विभागीय रेल्वे अभियंता (समन्वय) पवन पाटील, सहायक विभागीय यांत्रिक अभियंता आर. एल. प्यासे, मुख्य तिकीट निरीक्षक अमरेश कुमार, लिपिक अंशु नागेश बनसोड, लोको पायलट जी. डी. कुमरे आणि कनिष्ठ अभियंता प्रियंका मुकुंदे यांचा समावेश आहे. कार्यक्रमाला अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (परिचालन) अनुप कुमार सत्पथी, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) मनोज तिवारी, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) जय सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि विभागीय क्रीडा अधिकारी कृष्णाथ पाटील, मुख्य कार्यालय अधीक्षक सुनील कापटे उपस्थित होते.

...............

Web Title: Distribution of Railway Fit India Freedom Run Award ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.