शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दररोज शेकडो प्रवाशांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचे वितरण

By नरेश डोंगरे | Updated: May 12, 2024 00:01 IST

सेवाभावी व्यक्ती, स्वयंसेवी संघटनांचाही सहभाग : गरमी अन् उकाड्यात रेल्वे प्रवाशांना दिलासा

नागपूर : सेवाभावी व्यक्ती आणि स्वयंसेवी संघटनांच्या मदतीने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार, नागपूर विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर दररोज सुमारे दोन हजारांवर रेल्वे प्रवाशांना पिण्याचे शुद्ध आणि थंड पाणी मोफत उपलब्ध करून दिले जात आहे.

उन्हाळ्यात दरवर्षी रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढते. उन्हाचा तडाखा आणि प्रचंड गर्दीमुळे शरीरातून घामाच्या धारा निघतात. उकाड्यामुळे शरीराला थोड्या थोड्या वेळेनंतर पाण्याची गरज भासते. मात्र, प्रत्येकच प्रवाशी खास करून ज्येष्ठ नागरिक, गाडीच्या खाली उतरून स्टॉलवर किंवा नळावर जाऊन पाणी घेऊ शकत नाही. अनेक जण पाण्याची बाटली विकत घेऊ शकत नाही. ते ध्यानात घेऊन त्यांना पिण्याचे शुद्ध आणि थंड पाणी मोफत उपलब्ध करून देण्याची योजना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी मांडली होती. त्यानुसार, ठिकठिकाणच्या सेवाभावी व्यक्ती आणि संस्थांना आवाहन करण्यात आले. त्याला अनेकांनी दाद दिली. त्यातून १४ एप्रिल २०२४ पासून प्रवाशांना मोफत पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून देण्यात आले. नागपूर विभागातील नागपूर, बल्लारशाह, सेवाग्राम आणि आमला यासह अनेक रेल्वे स्थानकांवर हा उपक्रम राबविला जात आहे. ज्या गाड्यांमध्ये प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असते, अशा गाड्यांच्या सामान्य आणि स्लीपर कोचजवळ जाऊन रेल्वे प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. साधारणत: दरदिवशी एका स्थानकावर दोन हजारांवर प्रवाशांना ही सुविधा दिली जात आहे. गर्दी आणि उकाड्यामुळे अस्वस्थ झालेल्या प्रवाशांना या स्तुत्य उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळत आहे. अधिकारीही देत आहेत सेवाया योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे, सेवा भाव जपणारे व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, संघटनांचे पदाधिकारी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसोबतच वरिष्ठ अधिकारीही स्वत: रेल्वे प्रवाशांना मोफत पाणी देण्याच्या उपक्रमात सहभागी होत आहेत. काही ठिकाणच्या संघटना बिस्किट पॅकेट आणि फळांचेही वाटप करीत असल्याचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी सांगितले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर