शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश, पाेषण आहाराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:10 IST2021-02-12T04:10:10+5:302021-02-12T04:10:10+5:30

बेलाेना : स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक व मध्यमिक शाळा तसेच अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश व शालेय पाेषण ...

Distribution of books, uniforms, food to school children | शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश, पाेषण आहाराचे वितरण

शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश, पाेषण आहाराचे वितरण

बेलाेना : स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक व मध्यमिक शाळा तसेच अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश व शालेय पाेषण आहाराचे नुकतेच वितरण करण्यात आले. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य दीक्षा मुलताईकर यांनी या शाळा व अंगणवाडीला भेट देऊन पाहणी केली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

याप्रसंगी दीक्षा मुलताईकर यांनी शालेय पाेषण आहाराची तपासणी केली. स्थानिक अंगणवाडी-१ च्या इमारतीची पाहणी करून नवीन इमारत उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी पालकांनी जिल्हा परिषद शाळेला सुरक्षा भिंत बांधून देण्याची व शाळेच्या इमारतीसह आवाराचे साैंदर्यीकरण करण्याची मागणी केली. याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचेही दीक्षा मुलताईकर यांनी पालकांना सांगितले. शाळेत विद्यार्थ्यांची ९१ टक्के उपस्थिती असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. शाळेची पटसंख्या वाढविण्यावर मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांना शासनाच्या शिक्षण क्षेत्रातील नवीन उपक्रमांची माहिती दिली. शाळेत साैारऊर्जा संच लावण्यात आल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मीनल मेंढे, ज्ञानेश्वर मुलताईकर, कैलास कांबळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Web Title: Distribution of books, uniforms, food to school children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.