गरजू पालकांना ब्लॅंकेटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:13 IST2020-12-30T04:13:14+5:302020-12-30T04:13:14+5:30
कन्हान : स्थानिक धर्मराज विद्यालयात धंताेली नागपूर येथील रामकृष्ण मठाच्या वतीने मंगळवारी (दि. २९) कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. ...

गरजू पालकांना ब्लॅंकेटचे वाटप
कन्हान : स्थानिक धर्मराज विद्यालयात धंताेली नागपूर येथील रामकृष्ण मठाच्या वतीने मंगळवारी (दि. २९) कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात विद्यालयातील ५० गरजू व गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रामकृष्ण मठाचे स्वामी तन्निष्ठानंद, अजय भोयर, अरुण राऊत, चेतन वलूकर उपस्थित होते. सामाजिक दायित्व जपत गरजू विद्यार्थ्यांच्या पालकांना ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आल्याचेही स्वामी तन्निष्ठानंद यांनी स्पष्ट केले. संचालन नरेंद्र कडवे यांनी केले तर दिनेश ढगे यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी सतीश राऊत, तेजराम गवळी, मुकेश साठवणे, दामोदर हाडके, प्रणाली खंते, बावनकुळे, सुनील लाडेकर, अमित मेंघरे, भीमराव शिंदेमेश्राम, सुनीता मनगटे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला शिक्षकांसह पालकांची उपस्थिती हाेती.