जि. प.च्या ६१ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली लस ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:08 IST2021-09-18T04:08:53+5:302021-09-18T04:08:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हा कोविड टास्क फोर्सच्या सूचनेनुसार आता शासकीय कार्यालयात देखील लसीकरण मोहीम वेगवान होणार ...

Dist. V. vaccinated by 61 officers and employees | जि. प.च्या ६१ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली लस ()

जि. प.च्या ६१ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली लस ()

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्हा कोविड टास्क फोर्सच्या सूचनेनुसार आता शासकीय कार्यालयात देखील लसीकरण मोहीम वेगवान होणार आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून शुक्रवारी जिल्हा परिषदेतील आबासाहेब खेडकर सभागृहात लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणाबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह होता. ज्यांनी अद्यापही पहिला डोस घेत नाही किंवा ज्यांचा दुसरा डोस प्रलंबित होता, त्या सर्वांनी या लसीकरण मोहिमेतून डोस घेतले. पहिल्या दिवशी ३७ कर्मचाऱ्यांनी पहिला तर २४ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला.

जिल्ह्यातील लसीकरणाला गतिमान करण्यासाठी व लोकांना लसीकरणाला प्रोत्साहित करण्यासाठी सध्या प्रशासनातर्फे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यातीलच एक भाग म्हणून शासकीय कार्यालयातील कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लसीकरण शासकीय कार्यालयात उपलब्ध असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

जिल्हा कोविड टास्क फोर्सच्या सूचनेनुसार पुढील आठवड्यातही अन्य शासकीय कार्यालयांमध्ये लवकरच लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या सणासुदीच्या कार्यकाळात नागरिकांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे. नागरिकांनी शारीरिक अंतर, सतत हात धुण्याचे आणि तोंडावर मास्क घालण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केले आहे.

00000

Web Title: Dist. V. vaccinated by 61 officers and employees