शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील इमामवाडा भागातील बीअर बारमध्ये तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 21:44 IST

धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर बीअर बारमध्ये तोडफोड करण्यात आली. इमामवाडा भागातील सिरसपेठ येथील आवारी चौकात असलेल्या प्रिया बीअर बारमध्ये रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ठळक मुद्देक्षुल्लक कारणावरून हाणामारी : आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर बीअर बारमध्ये तोडफोड करण्यात आली. इमामवाडा भागातील सिरसपेठ येथील आवारी चौकात असलेल्या प्रिया बीअर बारमध्ये रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.दीपक मधुकर पराडकर (वय ४०, रा. नरसाळा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी रात्री शेख शाहिद शेख रंगरेज (वय २६, रा. गवळीपुरा) हा त्याच्या तीन साथीदारांसह बारमध्ये आला. बराच वेळ हे चौघे तेथे दारू पीत होते. त्यानंतर एका ग्राहकाचा शाहिदला धक्का लागल्याने त्याने व साथीदाराने तेथे वाद घातला. लगेच तेथे हाणामारी सुरू झाली. पराडकर यांच्या तक्रारीनुसार, शाहिद आणि त्याच्या साथीदारांनी पराडकर तसेच बारमधील ग्राहकांना मारहाण केली. बारमधील खुर्च्या तसेच ग्लासेसची तोडफोड केली. एवढेच नव्हे तर बारमधील गल्ल्यात असलेले २५ ते ३० हजार रुपये लुटून नेले. पराडकर यांच्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला. शाहिदला अटक करण्यात आली. त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.सीसीटीव्हीच्या फुटेजमुळे कलाटणीया घटनेमुळे परिसरात काही वेळ तणाव होता. माहिती कळताच इमामवाड्याचे ठाणेदार रमाकांत दुर्गे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी तेथील गर्दी हटवून वातावरण शांत केले. माहिती कळताच मध्यरात्री पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनीही तिकडे धाव घेतली. उपायुक्त भरणे यांनी या प्रकरणाची माहिती जाणून घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता या प्रकरणाला भलतीच कलाटणी मिळाली. शाहिद आणि त्याच्या साथीदारांना बारमालक आनंद गायधने, योगेश गायधने आणि अन्य दोघांनीही मारहाण केल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पोलिसांनी बारमालक गायधनेंसह चौघांवर गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात असल्याचे ठाणेदार दुर्गे यांनी सांगितले. बारचा गल्ला लुटला गेला की नाही, त्याचीही चौकशी सुरू असल्याचे दुर्गे यांनी सांगितले. 

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर