वापरण्यासाठी दिलेल्या कारवरून वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:07 IST2021-04-02T04:07:43+5:302021-04-02T04:07:43+5:30
वाधवा यांचे सक्करदऱ्यातील दत्तात्रयनगरात कार डेकोरचे शोरूम आहे. आरोपी वैभव बाळापुरेसोबत वाधवा यांची ओळख असल्याने त्यांनी बाळापुरेला काही दिवसांपूर्वी ...

वापरण्यासाठी दिलेल्या कारवरून वाद
वाधवा यांचे सक्करदऱ्यातील दत्तात्रयनगरात कार डेकोरचे शोरूम आहे. आरोपी वैभव बाळापुरेसोबत वाधवा यांची ओळख असल्याने त्यांनी बाळापुरेला काही दिवसांपूर्वी स्वीफ्ट कार वापरण्यासाठी दिली होती. तीन दिवसानंतर वाधवा यांनी आपली कार परत मागितली असता, आरोपींनी आपण बाहेरगावी असल्याचे सांगून बाळापुरेने त्यावेळी टाळले. बुधवारी दुपारी १ च्या सुमारास आरोपी बाळापुरे, योगेश आकोडे आणि त्यांचे ८ ते १० साथीदार वाधवा यांच्या दुकानावर चालून आले. त्यांनी कार परत करणार नाही, असे म्हणत वाधवांसोबत वाद घातला आणि त्यांना दांडूने मारहाण केली. मोबाईल आणि कारचीही तोडफोड केली. झटापटीत वाधवा यांच्या गळ्यातील सोनसाखळी गहाळ झाली. वाधवा यांनी दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी आरोपी बाळापुरे, आकोडे आणि साथीदारांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
---