शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भाड्याच्या जागेचा वाद पेटला : घरमालकाने लावली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 20:32 IST

जागा रिकामी करून घेण्यासाठी भाडेकरूच्या प्रोडक्शन हाऊसला घरमालक आणि त्याच्या साथीदारांनी पेटवून दिले. या आगीत भाडेकरूचे अडीच लाखाचे नुकसान झाले. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली आणि गुरुवारी अखेर गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देअडीच लाखाचे नुकसानसोनेगावमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जागा रिकामी करून घेण्यासाठी भाडेकरूच्या प्रोडक्शन हाऊसला घरमालक आणि त्याच्या साथीदारांनी पेटवून दिले. या आगीत भाडेकरूचे अडीच लाखाचे नुकसान झाले. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली आणि गुरुवारी अखेर गुन्हा दाखल केला.विद्याधर रामधन माटे (वय ६५), मंगेश विद्याधर माटे, गुन्नू जयस्वाल आणि एक अनोळखी साथीदार अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी माटे यांच्या मालकी हक्काची जागा सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्वेनगरात आहे. ती त्यांनी सुमित दिनेश तिडके (वय ४२) यांना भाडेतत्त्वावर दिली होती. तेथे तिडके यांनी सुमित वेस्टर्न इवेंट्स नावाने प्रोडक्शन हाऊस सुरू केले होते. काही दिवसांपासून जागा रिकामी करून घेण्यासाठी भाडेकरू आणि घरमालक यांमध्ये वाद निर्माण झाला. त्यांच्यात अनेकदा खटकेही उडाले. या पा­र्श्वभूमीवर २८ मेच्या दुपारी तिडके यांच्या प्रोडक्शन हाऊसला आग लागली आणि त्यात त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जागामालक माटे आणि त्यांच्या साथीदारांनी पेट्रोल टाकून आपल्या प्रोडक्शन हाऊसला आग लावली आणि तेथील साहित्य चोरण्यासाठी आगीचा बनाव केल्याची तक्रार तिडके यांनी सोनेगाव पोलिस ठाण्यात दिली होती. या आगीत आपले दोन लाख, ४२ हजार रुपयांच्या सामानाचे नुकसान झाल्याचेही तिडके यांनी तक्रारीत नमूद केले होते. सोनेगाव पोलिसांनी हे प्रकरण चौकशीत ठेवले. महिनाभर चौकशी केल्यानंतर हवालदार ढोके यांनी या प्रकरणात आरोपी जागामालक विद्याधर माटे, त्यांचा मुलगा मंगेश, मित्र गुन्नू जयस्वाल आणि अन्य एक अशा चौघांवर गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :fireआगnagpurनागपूर