कचऱ्याची विल्हेवाट तुम्हीच लावा! मनपाचे गृहनिर्माण सोसायट्यांना पत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 08:42 PM2020-12-22T20:42:12+5:302020-12-22T20:44:23+5:30

Garbage issue, nagpur newsवर्षभरापूर्वी कचरा वर्गीकरणाची सक्ती करूनही त्याची शहरात अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. याचा विचार करता मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने १०० किलोहून अधिक कचरा निघणाऱ्या सोसायट्यांना कचऱ्याची तुम्हीच विल्हेवाट लावा, अशा आशयाचे पत्र पाठविले आहे.

Dispose of waste yourself! Letter to Corporation Housing Societies | कचऱ्याची विल्हेवाट तुम्हीच लावा! मनपाचे गृहनिर्माण सोसायट्यांना पत्र 

कचऱ्याची विल्हेवाट तुम्हीच लावा! मनपाचे गृहनिर्माण सोसायट्यांना पत्र 

googlenewsNext
ठळक मुद्देवर्षभरापूर्वीच केली होती सक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वर्षभरापूर्वी कचरा वर्गीकरणाची सक्ती करूनही त्याची शहरात अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. याचा विचार करता मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने १०० किलोहून अधिक कचरा निघणाऱ्या सोसायट्यांना कचऱ्याची तुम्हीच विल्हेवाट लावा, अशा आशयाचे पत्र पाठविले आहे. यासाठी सुरुवातीला प्रत्येक झोनमधील दोन सोसायट्यांची निवड करण्यात आली आहे. सोबतच शहरातील सर्वच मोठ्या सोसायट्यांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.

शहरात दररोज ११०० मेट्रिक टन कचरा निघतो. परंतु ओला व सुका कचरा पूर्णपणे वेगवेगळा संकलित केला जात नाही. यातील फक्त २०० मेट्रिक टन कचरा वेगवेगळा संकलित केला जातो. कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीचा करार संपुष्टात आल्यानंतर, महापालिकेने १६ नोव्हेंबर २०१९ पासून शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी ए. जी. एन्व्हायरो आणि बीव्हीजी या कंपन्यांना सोपविली आहे. त्यानुसार या दोन्ही कंपन्या दररोज शहरातून ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करणे अपेक्षित होते. परंतु वर्षभरानंतरही यात अपेक्षित सुधारणा झालेली नाही.

प्रत्येक झोनमधील दोन सोसायट्यांना पत्र

१०० किलोहून अधिक कचरा निघाणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना कचऱ्याची विल्हेवाट स्वत: लावावयाची आहे. यासंदर्भात वर्षभरापूर्वीच मनपा प्रशासनाने निर्देश दिले होते. अशा सोसायट्यातील कचरा मनपा उचलणार नाही, असे स्पष्ट केले होते. परंतु अजूनही बहुसंख्य सोसायट्यांनी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा निर्माण केलेली नाही. त्यामुळे प्रत्येक झोनमधील दोन सोसायट्यांना यासंदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे.

कचऱ्यापासून खत निर्मिती करा

सोसाट्यांनी परिसरात ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित न केल्यास सुका कचरा उचलला जााणार नाही. अशी भूमिका मनपा प्रशासनाने घेतली होती. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केल्यास सोसायट्यांनाच यापासून आर्थिक लाभ होणार आहे. परंतु त्यानंतरही बहुसंख्य सोसायट्यात ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करत नाही.

दंडात्मक कारवाईचा दिला होता इशारा

ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित न केल्यास महापालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. परंतु दंडात्मक कारवाई झाली नाही. राज्यातील काही महापालिकांकडून सोसाट्यांना कचरा वर्गीकरण न केल्यास पाच हजारांचा दंड आकारला जात आहे

.महापालिकेने प्रत्येक झोनमधील दोन सोसायट्यांना पत्र पाठवून ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करून ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आवाहन केले आहे. मनपाने स्वच्छता निरीक्षक नेमले आहेत. घरोघरी कचरा वर्गीकरणाचा संदेश पोहोचविणे व त्याची अंमलबजावणी कृतीमध्ये होणे अपेक्षित आहे. कचरा वर्गीकरणात दंडात्मक कारवाईपेक्षा नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

डॉ. प्रदीप दासरवार, उपायुक्त (घनकचरा) मनपा

Web Title: Dispose of waste yourself! Letter to Corporation Housing Societies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.