शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

नागपूर जिल्ह्यात कत्तलीसाठी नेणाऱ्या गुरांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 10:52 AM

देवलापार पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एक लाख २० हजार रुपये किमतीच्या १० बैलांची सोडवणूक करीत ती देवलापार येथील गोरक्षण केंद्रात पाठविली.

ठळक मुद्देदोन आरोपींना अटक देवलापार पोलिसांची हिवराबाजार परिसरात कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:देवलापारचे ठाणेदार सुरेश मट्टामी यांच्यासह पोलीस कर्मचारी हे रामटेक येथील प्रथम श्रेणी न्यायालयात गेले होते. तेथून हिवराबाजारमार्गे परत येत असताना त्यांना झिल्लू तलावाजवळ १० बैलांना एकमेकांना दोराने बांधून पायी घेऊन जाताना दोन व्यक्ती दिसले. बैलांच्या तोंडातून खूप फेस येत होता तसेच काठी आणि दोराने बैलाच्या शरीरावर मारहाण केल्याच्या जखमा आणि वळ दिसून आले. याबाबत पोलिसांनी आरोपींना विचारताच त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. तसेच बैल खरेदीच्या कागदपत्राबाबत विचारणा केल्यावरही त्यांच्याकडून काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे पंचासमक्ष त्या दोघांची चौकशी केली. चौकशीत मध्य प्रदेशातील गावांतून हे १० बैल त्यांनी आणल्याची कबुली देत कामठी येथे कत्तलीसाठी पायदळ घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. फारुख याकूब शेख (३३, रा. हिवराबाजार), रामेश्वर रोशन पिलगेरे (२८, रा. घोटी रमजान) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी देवलापार पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एक लाख २० हजार रुपये किमतीच्या १० बैलांची सोडवणूक करीत ती देवलापार येथील गोरक्षण केंद्रात पाठविली. आरोपींविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागविणे अधिनियमच्या सहकलम ५ (अ), ९, महाराष्ट प्राणी संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली.ही कारवाई ठाणेदार सुरेश मट्टामी यांच्या नेतृत्वात चालक पोलीस हवालदार विलास गायकवाड, पोलीस नायक राजू राठोड, संदीप कडू, शिपाई कुलदीप आहाके, योगेश कुहिटे यांनी पार पाडली. पुढील तपास ठाणेदार मट्टामी करीत आहे.

टॅग्स :crimeगुन्हे