शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

माढ्याच्या तिढ्यावर नागपुरात चर्चा! जानकर, गोरे, निंबाळकर, शहाजीबापूंनी घेतली फडणवीसांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 09:21 IST

जानकर, गोरे, निंबाळकर, शहाजीबापूंनी घेतली फडणवीसांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत सुरू असलेल्या नाराजीनाट्यावर नागपुरात चर्चा करण्यात आली. तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेले उत्तमराव जानकर यांच्यासह भाजप नेते जयकुमार गोरे, रणजितसिंह निंबाळकर आणि शहाजीबापू पाटील हेदेखील उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांनी सविस्तर चर्चा केली. आज ज्या विषयावर चर्चा झाली ते सगळे आमच्या कार्यकर्त्यांसमोर मांडून लवकरच निर्णय घेऊ, अशी भूमिका जानकर यांनी या भेटीनंतर पत्रकारांसमोर मांडली.

महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्याने जानकर नाराज होते. मात्र त्यामुळे आपल्या उमेदवाराला फटका बसेल, असे भाजप नेत्यांना वाटले व फडणवीसांनी त्यांना तत्काळ नागपुरात बोलावून घेतले. या भेटीत माढा लोकसभा मतदारसंघाविषयी सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. सायंकाळनंतर मी कार्यकर्त्यांशी चर्चा करेन. फडणवीस यांच्यासमोर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या अडचणी व भावना मांडल्या, असे जानकर यांनी सांगितले.

बारामतीवरून विमानाने...सोमवारी सकाळीच बारामती येथून विशेष विमानाने खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, शहाजीबापू पाटील आणि उत्तम जानकर हे नागपूरला गेले. त्याठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात आली. या बैठकीनंतर जानकर हे विमानाने पुण्यात आले. तसेच सायंकाळी ते वेळापूर या गावी बैठकीसाठी पोहोचले.

नाराज नव्हते, तोडगा निघाला- उत्तमराव जानकर हे आमचे चांगले मित्र आहेत. ते माझ्यावर कधीच नाराज नव्हते. सातत्याने ते माझ्याशी संपर्कात होते. आजच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सविस्तर चर्चा होऊन तोडगा निघाला आहे, अशी माहिती रणजितसिंह निंबाळकर यांनी दिली. - भाजपबद्दल जानकर यांची काही नाराजी, अडचणी होत्या. मोहिते-पाटील यांच्यासारख्या मोठ्या राजकीय घराण्याच्या विरोधात तीस वर्षे काम केले. त्यांना मानणारे तळागाळातील लोकही नाराज आहेत. या सर्व विषयावर सकारात्मक चर्चा झाली असा दावा शहाजीबापू पाटील यांनी केला. 

टॅग्स :nagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४