आर्थिक समस्यांवरील चर्चा पुन्हा टळली :  मनपाची बैठक पुढे ढकलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 08:20 PM2020-10-14T20:20:55+5:302020-10-14T20:22:32+5:30

NMC Meeting, Nagpur News शहारातील ठप्प पडलेली विकास कामे, अर्धवट सिमेंट रस्ते व आर्थिक विषयावर मनपातील सत्तापक्षातर्फे मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु ऐनवेळी ही बैठक रद्द झाली.

Discussion on financial issues avoided again: Corporation meeting postponed | आर्थिक समस्यांवरील चर्चा पुन्हा टळली :  मनपाची बैठक पुढे ढकलली

आर्थिक समस्यांवरील चर्चा पुन्हा टळली :  मनपाची बैठक पुढे ढकलली

Next
ठळक मुद्देविकास कामांना ब्रेक कायम

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहारातील ठप्प पडलेली विकास कामे, अर्धवट सिमेंट रस्ते व आर्थिक विषयावर मनपातील सत्तापक्षातर्फे मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु ऐनवेळी ही बैठक रद्द झाली. यात शहरातील विकास कामांना गती देण्यासंदर्भात निर्णय होण्याची अपेक्षा होती. जानेवारी महिन्यापासून शहरात कोणतीही नवीन विकास कामे झालेली नाही. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कार्यादेश दिलेली विकास कामे पूर्णपणे थांबविली होती. त्यात मार्च महिन्यात कोविड संक्रमण सुरू झाल्यापासून शहरातील विकासाला ब्रेक लागले आहे.

डिसेंबर२०१९ पर्यंत शहरातील विकास कामांनी गती पकडली होती. परंतु अचानक परिस्थिती बदलली. तुकाराम मुुंढे यांनी २८ जानेवारीला आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच त्यांनी सर्व प्रकारची कामे थांबविली. २५२३.८२ कोटींचे बजेट सादर करतानाच कार्यादेश दिलेल्या कामांना स्थगिती दिली. प्रयत्नानंतरही मार्च अखेरीस मनपा तिजोरीत २२५७.४५ कोटी जमा झाले. त्यानंतर कोविड संकटाने मनपाचे आर्थिक कंबरडे मोडले. मात्र जीएसटी अनुदानात वाढ झाल्याने थोडा दिलासा मिळाला. आता सत्तापक्षासोबतच विरोधी पक्षाचे नगरसेवक थांबलेली कामे सुरू करण्यासाठी आग्रही आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक होणार होती. परंतु महापौरांची प्रकृती ठिक नसल्याने बैठक पुढे ढकलल्याची चर्चा आहे. मात्र यावर अद्याप कोणत्याही स्वरुपाचे अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

Web Title: Discussion on financial issues avoided again: Corporation meeting postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app