डिझास्टर मॅनेजमेंट व्हिलेज नागपुरात

By Admin | Updated: October 9, 2016 02:16 IST2016-10-09T02:16:09+5:302016-10-09T02:16:09+5:30

नागपूर , नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स अकॅडमी नंतर आता देशातील एकमेव डिझास्टर मॅनेजमेंट व्हिलेज (सेंटर आॅफ एक्सिलन्स इन्स्टिट्यूट) ही नागपुरात प्रस्तावित आहे.

Disaster Management Village Nagpur | डिझास्टर मॅनेजमेंट व्हिलेज नागपुरात

डिझास्टर मॅनेजमेंट व्हिलेज नागपुरात

देशातील पहिले प्रशिक्षण केंद्र : सुरादेवीत १५० एकर जागेचा प्रस्ताव 
वसिम कुरेशी नागपूर
नागपूर , नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स अकॅडमी नंतर आता देशातील एकमेव डिझास्टर मॅनेजमेंट व्हिलेज (सेंटर आॅफ एक्सिलन्स इन्स्टिट्यूट) ही नागपुरात प्रस्तावित आहे. नागपूर-सावनेर मार्गावरील सुरादेवी येथे १५० एकर जमिनीवर अत्याधुनिक संसाधनांनी सज्ज हे प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. संकट काळात बचावाचे अद्ययावत प्रशिक्षण येथे दिले जाईल. देशाच्या विविध भागातून एनडीआरएफ व एसडीआरएफचे जवान येथे उच्च दर्जाच्या प्रशिक्षणासाठी येतील.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या प्रशिक्षण केंद्रासाठी सध्या येथे सर्व्हेचे काम सुरू आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या चरणात दोन स्तराच्या ट्रेनिंग युनिटसाठी केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने परवानगी दिली आहे. या प्रशिक्षण केंद्रात महापुराच्या स्थितीचा सामना करायसाठी एक मोठा तलाव, एक महामार्गासारखा रस्ता, मेट्रो रेल्वेचे टनल व पूल उभारले जातील. प्रत्यक्ष नैसर्गिक संकटाच्या काळात काय उपाययोजना करायच्या याचे प्रशिक्षण येथे दिले जाईल. या डिझास्टर मॅनेजमेंट व्हिलेजमुळे नागपूरला आणखी एक आंतरराष्ट्रीय ओळख मिळणार आहे.

नागपुरातून कटकला जाणार १५ जवान
एनडीआरएफए नागपूर येथून १५ अधिकाऱ्यांची एक चमू कटक (ओडिशा), मुंडी येथे जात आहे. स्वित्झर्लंडवरून आलेली एक तज्ज्ञांची टीम येथे या जवानांना प्रशिक्षण देईल. नॅशनल कॅपेसिटी बिल्डिंग अंतर्गत येथे प्रशिक्षणार्थ्यांना कोलॅप्स स्ट्रक्चर, सर्च एण्ड रेस्क्यूचे प्रशिक्षण दिले जाईल. या चमूचे नेतृत्व एनडीआरएफचे अनुप कुमार करतील.

Web Title: Disaster Management Village Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.