कांजीहाऊसच्या शौचालयात घाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:27 IST2020-11-22T09:27:40+5:302020-11-22T09:27:40+5:30

बजेरियात कीडे आणि डासांचा प्रकोप नागपूर : प्रभाग क्रमांक-१९ च्या बजेरिया, संत्रा मार्केट, नायकवाड कुंडले वाडा या वस्तीत नियमित ...

Dirt in the toilet of the kanjihouse | कांजीहाऊसच्या शौचालयात घाण

कांजीहाऊसच्या शौचालयात घाण

बजेरियात कीडे आणि डासांचा प्रकोप

नागपूर : प्रभाग क्रमांक-१९ च्या बजेरिया, संत्रा मार्केट, नायकवाड कुंडले वाडा या वस्तीत नियमित साफसफाई होत नसल्याने किडे आणि डासांचा प्रकोप वाढला आहे. मनपा प्रशासन आणि आरोग्य अधिकारी नियमित सफाईबाबत गंभीर नाही. येथे जागोजागी घाण पसरली आहे. दाट वस्तीत जनावरे मोठ्या प्रमाणात फिरताना दिसतात. या भागात नियमित स्वच्छता होत नसल्याने घाणीचे साम्राज्य असल्याचे नागरिकांचे मत आहे. आरोग्य झोन अधिकारी सुरेश खरे व नगरसेवक याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे वस्त्यांमध्ये आजार पसरण्याची भीती नागरिकांमध्ये आहे.

आरटीओ कार्यालयात समस्या

नागपूर : सिव्हील लाईन्स येथील आरटीओ कार्यालयात अनेक समस्या आहेत. या ठिकाणी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सॅनिटायझरची व्यवस्था नाही. शिवाय सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत नाही. ऑनलाईन वेळ घेतल्यानंतरही सुरळीत काम होत नाही. वेळेवर काऊंटर सुरू होत नाहीत. स्वच्छतेचा अभाव आहे. कार्यालयात लावण्यात आलेली मशीन केवळ देखाव्यासाठी आहे. आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. या समस्या सोडविण्याची नागरिकांची मागणी आहे.

Web Title: Dirt in the toilet of the kanjihouse