शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

त्रिभुवनदास भीमजी झवेरीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 22:10 IST

सोने जमा केल्यास वर्षाला १८ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी त्रिभुवनदास भीमजी झवेरी या प्रसिद्ध सराफा पेढीचे मालक हेमंत ब्रिजलाल झवेरी (रा. मुंबई) विरुद्ध सदर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. या घडामोडीमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

ठळक मुद्देफसवणुकीची तक्रार : लाखो रुपये थकविल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोने जमा केल्यास वर्षाला १८ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी त्रिभुवनदास भीमजी झवेरी या प्रसिद्ध सराफा पेढीचे मालक हेमंत ब्रिजलाल झवेरी (रा. मुंबई) विरुद्ध सदर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. या घडामोडीमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.सदरमधील बैरामजी टाऊन, पूनम चेंबरमध्ये त्रिभुवनदास भीमजी झवरी (टीबीझेड) नावाचे मोठे ज्वेलर्स आहे. येथे आपण सोने जमा ठेवल्यास महिन्याला दीड टक्का (वर्षाला १८ टक्के) व्याज देण्याची योजना चार वर्षांपूर्वी टीबीझेडने जाहीर केली होती. ज्वेलर्समध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला माहिती देऊन या योजनेत सहभागी होण्याचा आग्रह येथील कर्मचारी करीत होते. नेल्सन चौकात राहणारे अब्दुल कलाम आझाद अब्दुल मजिद (वय ६०) यांनी १ जानेवारी २०१४ ला या योजनेत सहभागी होऊन लाखोंचे सोने टीबीझेडकडे जमा केले. २० मार्च २०१७ ला त्यांनी आपली जमा झालेली ५० लाख रुपयांची रोकड परत मागितली. कलाम यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, टीबीझेडचे संचालक हेमंत झवेरी यांनी रक्कम परत देण्यास नकार दिला. बराच वाद झाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार करण्याचा कलाम यांनी पवित्रा घेतला. त्यामुळे त्यांना झवेरी यांनी रक्कम परत देण्याचे आश्वासन देऊन शांत केले. त्यानंतर त्यांना ५० पैकी ४६ लाख रुपये परत केले. उर्वरित ४ लाख रुपये देण्यास नकार दिल्यामुळे कलाम यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. राज्यातील सराफा पेढ्यांमध्ये मोठे नाव असलेल्या ज्वेलर्सच्या संचालकाविरुद्धची तक्रार असल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानंतर शुक्रवारी रात्री सदरचे पोलीस उपनिरीक्षक एम. बी. चौरसिया यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आज दुपारी या घडामोडीची जोरदार चर्चा सराफा बाजारात पसरली. त्यानंतर उलटसुलट चर्चेला उधाण आले.आणखी दोघांच्या तक्रारीझवेरी यांनी लाखो रुपयांनी फसवणूक केल्याच्या तक्रारी आणखी दोघांनी सदर पोलीस ठाण्यात केल्या. त्याचाही वेगळा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या दोन तक्रारकर्त्यांची नावे उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, अन्य दोघांच्या अशाच तक्रारी आमच्याकडे आल्याचे सदर पोलिसांनी लोकमतशी बोलताना मान्य केले.

टॅग्स :nagpurनागपूरCrimeगुन्हा