शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर रेशनऐवजी येणार थेट रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 15:40 IST

Nagpur : छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि वर्धा जिल्ह्यात लागू होणार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर आता अन्नधान्याऐवजीची थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे. राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी जारी केला. हा निर्णय छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील केवळ वर्धा जिल्ह्यासाठी लागू करण्यात आला आहे.

या योजनेचा शासन निर्णय २८ फेब्रुवारी २०२३ रोजी मंजूर झाला. त्यानुसार, या योजनेतून लाभार्थ्यांना जानेवारी २०२३ पासून प्रति महिना १५० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार होते. मात्र, नंतर २० जून २०२४ रोजी या योजनेत सुधारणा करण्यात आली.

या सुधारित निर्णयानुसार, आता एप्रिल २०२४ पासून प्रति महिना प्रति लाभार्थी १६० रुपये थेट रोख रक्कम देण्यात येणार आहे. या रकमेने अन्नधान्याच्या जागी शेतकऱ्यांना थेट पैसे मिळणार आहेत. शासनाने आधी ठरवले होते की प्रति लाभार्थी १५० रुपये देण्यात येतील; पण नंतर या रकमेतील वाढ करून ती १६० रुपये केली आहे. हा बदल शेतकऱ्यांसाठी आणखी फायदेशीर ठरला आहे. याशिवाय, राज्य सरकारने या योजनेत अन्नधान्य वितरणातील गुंतागुंतीला कमी करण्यासाठी व वितरण सोपे व्हावे यासाठी लेखाधिकारी, आरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रण अधिकारी यांना नियुक्त करून योजनेची योग्य अंमलबजावणी करणार असल्याचेही जाहीर केले आहे.

महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकिपर फेडरेशनचा विरोध

  • ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकिपर फेडरेशनने शासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. फेडरेशनचे कार्याध्यक्ष संजय पाटील यांचे म्हणणे आहे की, ही योजना गरीब कार्डधारक जनतेची शुद्ध फसवणूक आहे.
  • हक्काच्या रेशनपासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे. उद्या ही योजना सर्व लाभार्थ्यांसाठीही लागू केली जाईल. शासन गरीब लाभार्थ्यांना रेशनऐवजी रक्कम देऊन मोकळी होईल. यामुळे भूकबळी व उपासमारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे शासनाने यावर फेरविचार करावा अन्यथा जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
टॅग्स :nagpurनागपूर