नागपूर : सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ दीनानाथ कृष्णराव दस्तुरे (७७) यांचे आजारपणामुळे गुरुवारी निधन झाले. ते सर्वभाषिय ब्राह्मण संघ, विदर्भ प्रदेशचे अध्यक्ष होते. ते नागपूर सुधार प्रन्यासमधून कार्यकारी अभियंता म्हणून निवृत्त झाले होते. समाजाच्या विकासासाठी आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी साऊथ पॉर्इंट स्कूल आणि रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूलची स्थापना केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळांनी प्रगती केली. सातत्याने सामाजिक कार्यात ते सक्रिय राहिले. त्यांच्यापश्चात दोन मुले सत्यजित आणि देवेंद्र दस्तुरे तसेच मुलगी सोनाली पुरोहित आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी रा.स्व.संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, महापौर प्रवीण दटके, आ. सुधाकर कोहळे, गिरीश व्यास, डॉ. रवींद्र भोयर, अभिजित वंजारी, प्रमोद पेंडके, किरण पांडव, संजय महाकाळकर, दीनानाथ पडोळे, आ. कृष्णा खोपडे, संदीप जोशी आदींनी शोकसंवेदना व्यक्त केली. (प्रतिनिधी)
दीनानाथ दस्तुरे यांचे निधन
By admin | Updated: December 11, 2015 03:47 IST