शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीला पुन्हा मिळाले ७० कोटी रूपये, २१४ कोटीचा विकास आराखडा

By आनंद डेकाटे | Updated: July 28, 2023 18:32 IST

विकास कामाला पावसाळ्यानंत सुरुवात

नागपूर :दीक्षाभूमीच्या विकासासाठी राज्य शासनाने पुन्हा ७० कोटी रूपये प्रदान केले आहे. यापूर्वी ४० कोटी रूपये नासुप्रकडे जमा आहे, असे एकूण ११० कोटी रूपये जमा झाले असून लवकरच कामाला सुरूवात केली जाणार आहे.दीक्षाभूमीचा विकास हा जागतिक दर्जानुसार करण्यासाठी राज्य शासनाने नवीन विकास आराखडा तयार केला आहे.

एकूण २१४ कोटी रूपयाचा हा विकास आराखडा आहे. काही वर्षांपूर्वीच ४० कोटी रूपयाचा पहिला हप्ता हा नासुप्रकडे प्रदान करण्यात आला होता. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे कामाला सुरुवात होऊ शकली नाही. आता सर्व प्रकारच्या अडचणी दूर झाल्याचे सांगितले जाते. यातच ७० कोटी रूपो पुन्हा दीक्षाभूमीच्या विकासासाठी प्रदान करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे हा निधी वितरित करण्यात आला आहे. नागपूर सुधार प्रन्यास ही नोडल एजन्सी राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नासुप्रने दीक्षाभूमीच्या विकास कामासाठी निविदाही काढण्याची तयारी सुरु केली आहे. लवकरच या निविदा जारी केल्या जाणार असल्याचे सांगितले जाते. त्यानुसार पावसाळ्यानंर दीक्षाभूमीच्या नवीन विकास आराखड्यानुसार कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविली आहे.

दीक्षाभूमीच्या नवीन विकास आराखड्यानुसार राज्य सरकारकडून ७० कोटी रूपयाचा निधी गुरुवारी वितरित करण्यात आला आहे. लवकरच कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.

- डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, सामाजिक न्याय विभाग

असा होणार विकास

- मध्यवर्ती स्मारकाचे प्रवेशद्वार नवीन मोठे व कलात्मक करणे- ११.१२ मीटर उंच अशोक स्तंभ-ओपन थिएटर- भव्य मुख्य गेट- कायमस्वरुपी स्टेज- नवीन कलात्मक सुरक्षा भिंत

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर