शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवर एक वही एक पेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:30 IST

दीक्षाभूमीवर येताना मेणबत्ती आणि पुष्प आणण्यापेक्षा एक वही आणि एक पेन घेऊन या. यामुळे समाजातील अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल, हा संदेश देत ‘एक वही एक पेन’ हा उपक्रम गेल्या काही वर्षापासून धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याच्या काळात दीक्षाभूमीवर राबविला जातो. यावर्षीही प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने हा उपक्रम दीक्षाभूमीवर राबविला जाणार आहे.

ठळक मुद्देसम्राट अशोक संस्थेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दीक्षाभूमीवर येताना मेणबत्ती आणि पुष्प आणण्यापेक्षा एक वही आणि एक पेन घेऊन या. यामुळे समाजातील अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल, हा संदेश देत ‘एक वही एक पेन’ हा उपक्रम गेल्या काही वर्षापासून धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याच्या काळात दीक्षाभूमीवर राबविला जातो. यावर्षीही प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने हा उपक्रम दीक्षाभूमीवर राबविला जाणार आहे.संस्थेतर्फे डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर हा स्टॉल लावण्यात येणार आहे. दरवर्षी दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांकडून या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत असून प्रत्येक वर्षी हजारो वह्या आणि पेन या उपक्रमातून गोळा करून विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वितरित केल्या जातात. दीक्षाभूमीवर अभिवादनासाठी जाताना मेणबत्ती, अगरबत्ती आणि पुष्प अर्पण करण्याची इच्छा अनेकांची असते. मात्र सर्व साहित्य पुढे कचरा रुपाने फेकण्यात जाते. त्यामुळे या साहित्याऐवजी वही आणि पेन आणल्यास ते गरजू मुलांच्या उपयोगात येऊ शकते, हा प्रचार तरुणांकडून करण्यात आला आणि या उपक्रमाचे नागरिकांनीही स्वागत केले. त्यामुळे या उपक्रमाला व्यापक रुप आले आहे. यावर्षीही उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास संस्थेचे अनिकेत कुत्तरमारे यांनी व्यक्त केला. या उपक्रमाशिवाय संस्थेतर्फे दुसरा एका स्टॉलवर मेडिकल हेल्थ कॅम्प व सॅनिटरी नॅपकीनचे वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपक्रमात शिरीष फुलझेले, डॉ. पंकज वासनिक, शीतल गडलिंग, स्वप्नील निखाडे, सिद्धांत पाटील, नीलेश बागडे आदींचा सहभाग राहील.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर