शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमी : दुसऱ्या दिवशी सहा हजार अनुयायांनी घेतली दीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 23:39 IST

बौद्ध धम्म प्रज्ञा, करुणा, समता शिकविते. या जगात सुखी आणि उत्तम जीवन जगता येण्यासाठी माणसाला याच गोष्टींची गरज आहे. म्हणूनच दरवर्षी दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्याचे आयोजन केले जाते. बुधवारी सहा हजारांवर बाबासाहेबांच्या अनुयायांना बौद्ध धम्मगुरु भदन्त नागार्जुन सुरेई ससाई यांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली.

ठळक मुद्देशेकडो अनुयायी बौद्ध धम्माच्या वाटेवर 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बौद्ध धम्म प्रज्ञा, करुणा, समता शिकविते. या जगात सुखी आणि उत्तम जीवन जगता येण्यासाठी माणसाला याच गोष्टींची गरज आहे. म्हणूनच दरवर्षी दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्याचे आयोजन केले जाते. बुधवारी सहा हजारांवर बाबासाहेबांच्या अनुयायांना बौद्ध धम्मगुरु भदन्त नागार्जुन सुरेई ससाई यांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो बांधवांसह नागपुरात बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन जगात एक नवी धम्मक्रांती केली. या ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी यांच्यावतीने बौद्ध दीक्षा-विधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भदन्त सुरेई ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ५०० वर श्रामणेर व सहा हजार अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यावेळी श्रामणेर झालेल्यांना चिवर दान देण्यात आले. दीक्षा देण्याचा हा कार्यक्रम गुरुवार १८ आॅक्टोबरपर्यंत चालणार आहे. भदन्त सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली व दीक्षाभूमी स्मारक समितीचे कार्यवाह सदानंद फुलझेले यांच्या उपस्थितीत अनुयायांना दीक्षा दिली जात आहे.प्रारंभी बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर अनुयायांना २२ प्रतिज्ञाचे वाचन करावयास लावले. श्रामणेर यांना पंचशीलचे महत्व सांगून ते आत्मसात करण्यास सांगण्यात आले. बुधवारी श्रामणेरची दीक्षा घेतलेल्यांमध्ये १० वर्षीय मुलापासून ते ५५ वर्षीय अनुयायांचा समावेश होता. धम्म दीक्षा घेण्यासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, चेन्नई, कोलकाता, मराठवाडा, नाशिक, मुंबई व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आले आहेत. दीक्षेच्या या कार्यक्रमात स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ता रवी मेंढे हे विशेष परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर