दीक्षाभूमी :  पाच हजार अनुयायांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 12:51 AM2019-10-08T00:51:09+5:302019-10-08T00:53:03+5:30

सोमवारी सकाळी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात बौद्ध धम्मदीक्षा विधीला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी पाच हजार अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. सलग तीन दिवस हा सोहळा दीक्षाभूमीवर चालणार आहे.

Dikshabhomi : five thousand followers initiation Baudha Dhamma | दीक्षाभूमी :  पाच हजार अनुयायांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा 

दीक्षाभूमी :  पाच हजार अनुयायांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा 

Next
ठळक मुद्देउत्तर भारत, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड येथील नागरिकांचा समावेश

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : ६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांनी दीक्षाभूमी फुलू लागली आहे. सोमवारी सकाळी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात बौद्ध धम्मदीक्षा विधीला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी पाच हजार अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. सलग तीन दिवस हा सोहळा दीक्षाभूमीवर चालणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने भदंत सुरेई ससाई यांच्या मार्गदर्शनात दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा सोहळा आयोजित केला जातो. दरवर्षी सुमारे १२ ते १५ हजारावर लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. या सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी दोन हजार तर दुसऱ्या दिवशी पाच हजार अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यात तरुणांसोबतच महिलांचाही मोठा सहभाग होता. भदंत ससाई यांच्या नेतृत्वात भन्ते नागघोष, भन्ते नागसेन, भन्ते धम्मप्रकाश, भन्ते नागधम्म यांनी अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि २२ प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली.
धम्मदीक्षा घेणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील अनुयायांचा समावेश होता. बौद्ध धम्माची दीक्षा घेणाऱ्यांकडून धर्मांतरण करण्याबाबत एक प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात आले. यात त्याचे नाव, गाव पत्ता, कोणता धर्म सोडून बौद्ध धम्माची दीक्षा घेत आहे, याबाबतची माहिती आहे. दीक्षार्थीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने बौद्ध दीक्षा प्रमाणपत्र देण्यात आले. या सोहळ्याकडे स्मारक समितीचे विलास गजघाटे हे विशेष लक्ष ठेवून आहेत. या सोहळ्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ता रवी मेंढे हे विशेष परिश्रम घेत आहेत.

Web Title: Dikshabhomi : five thousand followers initiation Baudha Dhamma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.