वैद्यकीय शिक्षण क्षेत्राचे डिजिटलायझेशन
By Admin | Updated: March 5, 2017 01:59 IST2017-03-05T01:59:31+5:302017-03-05T01:59:31+5:30
येत्या दोन वर्षांत वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील कार्यप्रणालीचे संपूर्ण ‘डिजिटलायझेशन’ करण्यात येणार आहे,
_ns.jpg)
वैद्यकीय शिक्षण क्षेत्राचे डिजिटलायझेशन
कुलगुरू म्हैसेकर : दादासाहेब काळमेघ स्मृती डेन्टल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलच्या आॅडिटोरियमचे उद्घाटन
नागपूर : येत्या दोन वर्षांत वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील कार्यप्रणालीचे संपूर्ण ‘डिजिटलायझेशन’ करण्यात येणार आहे, अशी ग्वाही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी येथे दिली. वानाडोंगरी येथील स्वर्गीय दादासाहेब काळमेघ स्मृती डेन्टल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलमधील आॅडिटोरियमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिकुलगुरू प्रा. डॉ. मोहन खामगावकर, शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, मुंबईचे अधिष्ठाता आणि डेन्टल कौन्सिल आॅफ इंडियाचे सदस्य डॉ. मानसिंग पवार, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूरचे माजी अधिष्ठाता डॉ. विनय हजारे, कोषाध्यक्ष आर. एम. सिंग, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. मिलिंद देशपांडे, डॉ. यशवंत पाटील, संस्थेचे अध्यक्ष शरद काळमेघ, हेमंत काळमेघ आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर यांनी आपल्या भाषणातून सभागृहाचे सुंदर बांधकाम केल्याबद्दल अभियंता आणि आर्किटेक्टचे अभिनंदन केले. त्यांनी डॉ. मानसिंग पवार यांना ‘स्कीलबेसड् कोर्से’स सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांना कोणती समस्या किंवा सल्ला हवा असल्यास ई-मेल करण्याचा सूचनाही दिल्या. सर्वांनाच ‘बायोमेट्रिक’अनिवार्य असल्याचेही त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
संशोधनाचा फायदा
‘कॉलेज टू व्हिलेज’
यावेळी माजी अधिष्ठाता डॉ. विनय हजारे यांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. ते म्हणाले, स्वर्गीय दादासाहेब काळमेघ स्मृती डेन्टल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारचे ‘रिसर्च प्रोजेक्ट’राबविण्यात येतात, त्याचा फायदा ‘कॉलेज टू व्हिलेज’यांना देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कामातील पारदर्शकता हीच यशाची गुरुकिल्ली
डॉ. मानसिंग पवार म्हणाले, या महाविद्यालयासाठी शरद आणि हेमंत काळमेघ यांचे भरीव योगदान राहिले आहे. त्यांच्या कामातील पारदर्शकता हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे. हे कॉलेज एक ‘मॉडेल’ कसे बनेल, याकरिता प्रयत्नरत राहण्याचे आवाहन केले.
महाविद्यालयाच्या यशात
विद्यार्थ्यांचा सिंहाचा वाटा
शरद काळमेघ म्हणाले, ११ वर्षांत या महाविद्यालयाने यशाचे शिखर गाठले. या कॉलेजच्या यशात येथील विद्यार्थ्यांचा सिंहाचा वाटा आहे. येणाऱ्या वर्षांत विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करीत महाविद्यालयाला‘रोल मॉडेल’बनविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
वैद्यकीय क्षेत्राचा निकाल ‘आॅनलाईन’
डॉ. खामगावकर म्हणाले, विद्यापीठाने गुंतागुंतीच्या कामात पारदर्शकता आणण्याच्या कामाबरोबर अनेक कामात आमूलाग्र बदल घडून आणला आहे. वैद्यकीय क्षेत्राचा निकाल आता ‘आॅनलाईन’ झाला असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक डॉ. संजय पाटील यांनी केले. संचालन डॉ. सुनीता कुळकर्णी व मरियन थरियन यांनी केले तर आभार सिनेट सदस्य कृष्णा बोंडे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.