अर्धवट बांधकामुळे परवाना काढणे कठीण

By Admin | Updated: June 24, 2014 00:49 IST2014-06-24T00:49:30+5:302014-06-24T00:49:30+5:30

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) मागील वर्षी १० लाख रुपये दिले, परंतु दर्जाहिन आणि अर्धवट बांधकाम सोडून दिल्याने याच फटका विशेषत: परवाना

Difficult to remove license due to partial construction | अर्धवट बांधकामुळे परवाना काढणे कठीण

अर्धवट बांधकामुळे परवाना काढणे कठीण

आरटीओ : पीडब्ल्यूडीची उदासीनता
नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) मागील वर्षी १० लाख रुपये दिले, परंतु दर्जाहिन आणि अर्धवट बांधकाम सोडून दिल्याने याच फटका विशेषत: परवाना विभागात येणाऱ्यांना बसत आहे.
शहरात वाहतूक पोलिसांकडून परवान्याची तपासणी मोहीम जोरात सुरू आहे. यामुळे आरटीओमध्ये मोटार वाहन परवाना काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परंतु पाणी, शौचालय, शेड व बसण्याच्या व्यवस्थेच्या अभावात उमेदवारांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. मागील आठवड्यात याचा फटका एका महिलेला बसला. परवाना काढण्यासाठी आलेली एक महिला बेशुद्ध पडली होती. या विषयी तक्रारी वाढल्याने येथे दोन कूलर लावण्यात आले. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार येथे पंखे, शेड, बैठक व्यवस्था आणि अन्य व्यवस्थेची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे.
यासाठी त्यांना निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु विभागाचा उदासीनपणा आणि निकृष्ट दर्जाचे बांधकामामुळे आरटीओ अडचणीत आले आहे. या संदर्भाची तक्रार विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Difficult to remove license due to partial construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.