शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

नागपुरात डिझेल, पेट्रोल चोरीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 10:37 PM

टँकरमधून डिझेल,पेट्रोलची चोरी करून त्याची काळाबाजारात विक्री करणाऱ्या टोळीच्या खापरीतील अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने शनिवारी दुपारी छापा मारला. तेथून पोलिसांनी डिझेलचे दोन टँकर तसेच खुले डिझेल आणि पेट्रोल जप्त केले. मात्र, पोलीस आल्याची कुणकुण लागताच सर्व आरोपी तेथून पळून गेले. या कारवाईमुळे तेलमाफियांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे खापरीतील डिझेल-पेट्रोल चोरी करणाऱ्यांची टोळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

ठळक मुद्देडिझेलचे दोन टँकर, खुले डिझेल-पेट्रोल जप्त : आरोपी पळालेगुन्हे शाखेची खापरीत कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टँकरमधून डिझेल,पेट्रोलचीचोरी करून त्याची काळाबाजारात विक्री करणाऱ्या टोळीच्या खापरीतील अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने शनिवारी दुपारी छापा मारला. तेथून पोलिसांनी डिझेलचे दोन टँकर तसेच खुले डिझेल आणि पेट्रोल जप्त केले. मात्र, पोलीस आल्याची कुणकुण लागताच सर्व आरोपी तेथून पळून गेले. या कारवाईमुळे तेलमाफियांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे खापरीतील डिझेल-पेट्रोल चोरी करणाऱ्यांची टोळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.खापरी, डोंगरगाव, बुटीबोरी, हिंगणा परिसरात डिझेल,पेट्रोल,रॉकेल आणि काळे ऑईल चोरून त्याची काळाबाजारात विक्री करण्याचा गोरखधंदा गेल्या १५ ते २० वर्षांपासून सुरू आहे. खापरी डेपोतून डिझेल,पेट्रोलचे टँकर घेऊन बाहेर पडणाऱ्या टँकर चालकासोबत संगनमत करून आणि नाही ऐकल्यास वाहनचालकाला शस्त्राच्या धाकावर बाजूच्या जंगलात नेले जाते. तेथे टँकरमधून डिझेल, पेट्रोल ड्रम, टाक्या आणि कॅन(डबक्या)मध्ये काढून त्याची नंतर वाहनचालकांना विक्री केली जाते. वर्षांनुवर्षांपासून सुरू असलेल्या या गोरखधंद्यात तेलमाफियांसह अनेक गुन्हेगार सहभागी आहेत. अधूनमधून पोलीस कारवाई करतात. त्यानंतरचे काही दिवस हा गोरखधंदा बंद होतो. पुन्हा काही दिवसांनी तेलमाफिया गुन्हेगारांच्या साथीने हा धंदा सुरू करतात. त्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांना मिळाली. त्यांनी लगेच युनिट चारच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, शनिवारी दुपारी ४.३० च्या सुमारास खापरीतील महेश ढाब्याजवळच्या प्यारेभाई गॅरेजजवळ पोलिसांचा मोठा ताफा पोहचला. बाजूच्या खुल्या जागेत दोन डिझेलचे टँकर उभे होते. त्यातून मोठ्या प्रमाणात डिझेल तर दुसºया टँकरमधून पेट्रोल काढून डबक्यांमध्ये ठेवले होते. आणखी डिझेल काढण्याची तयारी सुरू होती. मात्र, पोलिसांचा मोठा ताफा आल्याचे पाहून सर्वच्यासर्व आरोपी वाट मिळेल त्या दिशेने पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र, एकही आरोपी पोलिसांच्या हातात आला नाही.दरम्यान, पोलिसांनी तेथून एमएच २८/बी ८१५५ क्रमांकाच्या टँकरमधून सुमारे ३८ लाख १६ हजारांचे १२ हजार लिटर डिझेल, एमएच ३१/ डीएस ०२७९ क्रमांकाच्या टँकरमधून १० हजार लिटर डिझेल आणि डबक्यात भरून असलेले २०० लिटर डिझेल तसेच २० लिटर पेट्रोल, असे एकूण ७५ लाख ११,२०० रुपयांचे डिझेल,पेट्रोल जप्त केले. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त सुधीर नंदनवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांच्या नेतृत्वात युनिट चारच्या पथकाने ही कामगिरी बजावली.डीलर्स असोसिएशनच्या अध्यक्षाची तक्रारया प्रकरणात विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित रमेशचंद्र गुप्ता यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली. बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, टँकरच्या मालक, चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांच्याकडून या गोरखधंद्यात गुंतलेल्या तेलमाफियांची नावे पुढे येऊ शकतात.

 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलtheftचोरी