देशात हुकूमशाहीने जन्म घेतलाय; तलवारीच्या जोरावर चालवली जात आहे सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2023 06:57 PM2023-01-11T18:57:03+5:302023-01-11T18:58:20+5:30

Nagpur News ज्या देशातील विरोधी पक्ष हा कमजोर असतो, त्या देशात हुकूमशाही जन्माला येते आणि आपल्या देशात तानाशाहीने (हुकूमशाही) जन्म घेतला आहे, अशी जाहीर टीका राष्ट्रीय किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी येथे केली.

Dictatorship is born in the country; Power is being wielded by the sword | देशात हुकूमशाहीने जन्म घेतलाय; तलवारीच्या जोरावर चालवली जात आहे सत्ता

देशात हुकूमशाहीने जन्म घेतलाय; तलवारीच्या जोरावर चालवली जात आहे सत्ता

Next

नागपूर : ज्या देशातील विरोधी पक्ष हा कमजोर असतो, त्या देशात हुकूमशाही जन्माला येते आणि आपल्या देशात तानाशाहीने (हुकूमशाही) जन्म घेतला आहे, अशी जाहीर टीका राष्ट्रीय किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी येथे केली. बहुजन संघर्ष समितीतर्फे बुधवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात समतेसाठी भव्य शेतकरी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते.

टिकैत म्हणाले, आजचे सरकार हे देशाच्या संविधानाला मानत नाही. देशाच्या कायद्याला मानत नाही. यांना केवळ सत्ता हवी आहे. सत्ता मिळवण्यासाठी ते काहीही करू शकतात. महाराष्ट्रातील सरकार उलथवले. मध्य प्रदेशातही तेच केले. उत्तर प्रदेशात तर ३०-३० हजार मतांनी निवडून आलेल्या उमेदवाराला मतदानाच्या दिवशी धमकी देऊन घरी पाठवले आणि स्वत:चे उमेदवार निवडून आणले. एक प्रकारे तलवारीच्या जोरावर सत्ता चालवली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

दिल्लीत १३ महिने शेतकऱ्यांचे आंदोलन चालले; परंतु या आंदोलनात शेकडो लोक मारले जातील, याची अधिकाऱ्यांना आधीच कल्पना होती. या सरकारने हे षडयंत्र आधीच रचले होते. या देशातून शेतकरीच हद्दपार करण्याचे षडयंत्र आहे. त्यासाठीच तीन कृषी कायदे आणले. या देशातील संपत्ती केवळ पाच-दहा लोकांच्या हातात राहावी व इतर केवळ जिवंत राहावेत, असे हे षडयंत्र आहे. या देशातील शेती आणि येणारी पिढी वाचवण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही. आमचे आंदोलन हे समतेचे आंदोलन आहे, त्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. माजी मंत्री सुनील केदार, बहुजन संघर्ष समितीचे संयाेजक नागेश चौधरी, मलकियतसिंग यांनीही आपले विचार व्यक्त केले.

आरएसएस अतिशय घातक संघटना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही अतिशय घातक संघटना आहे. ही संघटना नकली हिंदू, नकली मुस्लीम बनवण्याचे काम करते. नकली शीख लोक बनवून त्यांना गुरुद्वारा कमिटीमध्ये घुसवण्यात आल्याची टीकाही टिकैत यांनी यावेळी केली.

आत्महत्या करू नका आंदोलनात सहभागी व्हा

आत्महत्या करून प्रश्न मिटणार नाही. लढावे लागले. तेव्हा आत्महत्या करू नका, आंदोलनात सहभागी व्हा, असे आवाहन टिकैत यांनी विदर्भातील शेतकऱ्यांना केले, तसेच खासगीकरणाच्या विरोधात सुरू असलेल्या वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला व स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनालाही त्यांनी आपले समर्थन जाहीर केले.

Web Title: Dictatorship is born in the country; Power is being wielded by the sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.