शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

उपचारापासून नागपुरातील डायलिसिसचे रुग्ण वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:10 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) डायलिसिस सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार न झाल्याने शुक्रवारी रुग्णांनी चांगलाच गोंधळ घातला.

ठळक मुद्देमेयो : डायलिसीस सेंटर पुन्हा चर्चेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) डायलिसिस सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार न झाल्याने शुक्रवारी रुग्णांनी चांगलाच गोंधळ घातला. या सेंटरमध्ये मागील काही दिवसांपासून औषधांची कमतरता आहे. याच कारणामुळे रुग्णांना उपचाराविनाच परत पाठविले जात होते. रुग्णांनी गोंधळ घालताच प्रशासनाने संपलेले इंजेक्शन मागविले आणि प्रकरण निवळले.मेयोतील डायलिसिस सेंटर सुरुवातीपासून चर्चेत आहे. मागील काही दिवसांपूर्वी अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे यांनी स्वत: सेंटर बंद करण्याबाबत प्रशासनाला पत्र लिहिले होते. पाण्याची टंचाई आणि इतर समस्यांमुळे रुग्णांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. सेंटरमध्ये येणाऱ्या रुग्णांना ‘हेपारिल’ नावाचे इंजेक्शन दिले जाते. परंतु, इंजेक्शन काल गुरुवारला संपले. याच कारणामुळे रुग्णांना परत पाठविण्यात आले. आज शुक्रवारी सकाळी रुग्णांची गर्दी झाली. मात्र, इंजेक्शन नसल्याचे सांगण्यात आले. यावरून रुग्णांनी चांगलाच गोंधळ घातला. रुग्णांनी जोरजोरात नारेबाजीसुद्धा केली. गोंधळ वाढत असल्याचे पाहून प्रशासनाने ताबडतोब इंजेक्शन मागविले. त्यानंतर रुग्णांवर उपचार सुरू झाला.कर्मचाऱ्यांचाही गोंधळमेयोमध्ये सर्जिकल कॉम्प्लेक्सच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. मागील काही दिवसांमध्ये न्यायालयात हा मुद्दा चर्चेत आला. जवळपास ७० कर्मचाऱ्यांची गरज आहे. सध्या जेवढ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली, ते सर्व क्रिस्टल कंपनीतून आऊटसोर्स करण्यात आले आहे. ८० कर्मचारी वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये कार्यरत आहेत. पण, वेतनाच्या मागणीला घेऊन सकाळच्या पाळीतील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. वेतन वाढविण्याच्या मागणीला घेऊन केलेल्या आंदोलनामुळे स्वच्छतेसह इतर कामे ठप्प पडली. वॉर्डापासून ते ओपीडीतील रुग्णांना बराच त्रास सहन करावा लागला. सकाळी ८.३० वाजेपासून शस्त्रक्रियागृहामध्येही गोंधळ पाहायला मिळाला. त्यानंतर कर्मचाऱ्यांची बैठक झाली आणि प्रकरण शांत झाले.

 

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर