आजारापूर्वीच निदान शक्य

By Admin | Updated: August 10, 2014 01:28 IST2014-08-10T01:28:52+5:302014-08-10T01:28:52+5:30

‘इको कार्डिओग्राफी’मुळे हृदयविकाराचे निदान आजार बळावण्यापूर्वी करणे शक्य झाले आहे. परंतु ‘इको’ व ‘एमआरआय कार्डिओग्राफी’ यांचा तुलनात्मक अभ्यास होणे आवश्यक आहे,

Diagnosis is possible even before illness | आजारापूर्वीच निदान शक्य

आजारापूर्वीच निदान शक्य

‘इको नागपूर-२०१४’ परिषदेचे उद्घाटन
नागपूर : ‘इको कार्डिओग्राफी’मुळे हृदयविकाराचे निदान आजार बळावण्यापूर्वी करणे शक्य झाले आहे. परंतु ‘इको’ व ‘एमआरआय कार्डिओग्राफी’ यांचा तुलनात्मक अभ्यास होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनी येथे केले.
नागपूर इको समिट व कार्डियालॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इको नागपूर-२०१४’ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून युनायटेड स्टेट्स आॅफ अमेरिका येथून डॉ. नील विस्समन, डॉ. बिजोय खण्डेरिया, डॉ. पार्थो सेनगुप्ता, डॉ. जे. सी मोहन, डॉ. मनीश बन्सल, डॉ. नितीन बुरकुले, डॉ. श्रीकांत सोला, व डॉ. दिगंबर नाईक उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक डॉ. शंतून सेनगुप्ता म्हणाले, हृदयरोग हा सर्वव्यापी जागतिक आजार आहे. यावर हृदयाचे स्पंदन टिपून चित्रीकरण करणारे ‘इको कार्डिओग्राफी’ मशीन उपचाराची दिशा ठरविण्यास अत्यंत उपयुक्त ठरत आहे. हृदयरोगांचे प्राथमिक अवस्थेतच निदान व प्रतिबंधासाठी अत्याधुनिक छायांकन यंत्रांनी व तंत्रानी तपासणी करणे हा या परिषदेचा मूळ उद्देश आहे. प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक डॉ. महेश फुलवानी यांनी केले. परिषदेत हृदयाच्या झडपा, हृदय निकामी प्रक्रिया तसेच कार्यक्षमता, क्षती, विशेष रचनात्मक दोष यांची चिकित्सा व चित्रांकन पध्दतीवर मार्गदर्शन करण्यात आले. डॉ अजीज खान, डॉ. विकास बिसने, डॉ. उदय माहूरकर, डॉ. विनोद खंडाईत, डॉ. निर्मल जायस्वाल, डॉ. दिगंबर नाईक डॉ. प्रशांत जगताप आदीनी वैज्ञानिक सत्रांचे अध्यक्ष व सह अध्यक्षपद भूषविले.
या परिषदेत ३०० वर डॉक्टर सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. शंतून सेनगुप्ता, डॉ. महेश फुलवानी, डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. अनुज सारडा विशेष परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Diagnosis is possible even before illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.