शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 22:24 IST

अभिनेता रणवीर सिंग याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली आणि  सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली.

-योगेश पांडे, नागपूरRanveer Singh Mohan Bhagwat: धुरंधर चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला अभिनेता रणवीर सिंग शुक्रवारी नागपुरात पोहोचला. यावेळी त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली आणि  सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. या भेटीत त्याने सरसंघचालकांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. रणवीर सिंग सव्वा चार नागपुरात होता व त्याचा दौरा अतिशय गुप्त ठेवण्यात आला होता हे विशेष.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी चार वाजता रणवीर सिंगचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्याच्यासोबत आणखी चार जण होते. 

स्मृतिमंदिर परिसराला भेट

तेथून रणवीर व त्याच्या सहकाऱ्यांनी थेट महालातील संघ मुख्यालय गाठले. तेथे त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतली. या भेटीदरम्यान रणवीरने त्याच्या चित्रपटाबाबत माहिती दिली. तसेच संघाची प्रणाली व विविध सेवाकार्यांबाबतदेखील जाणून घेतले. 

जवळपास दीड तास तो संघ मुख्यालयात होता. त्यानंतर तो रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात गेला. तेथे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्याने तेथील संघ पदाधिकाऱ्यांशीदेखील संवाद साधला. 

भेटीबद्दल गुप्तता

त्याने संघप्रणित चित्रभारती या संघटनेबाबतदेखील जाणून घेतले. त्यानंतर तो थेट नागपूर विमानतळाकडे रवाना झाला. रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास मुंबईकडे निघाला. त्याची ही भेट गुप्त ठेवण्यात आली होती. 

एकीकडे धुरंधर विक्रमांवर विक्रम करत असताना दुसरीकडे बॉलिवूडमधून मात्र चित्रपटाची हवी तशी प्रशंसा होत नसल्याबाबत नेटिझन्स व चित्रपट रसिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. अशा स्थितीत रणवीरने सरसंघचालकांची भेट घेतल्याने विविध कयास वर्तविण्यात येत आहे. 

संघाच्या शताब्दी निमित्त विजयादशमीला रणवीर सिंगने व्हिडीओ जारी करत संघाला शुभेच्छा दिल्या होत्या. मागील शंभर वर्षात संघाने जे कार्य केले त्यासाठी मी धन्यवाद देतो व पुढील काळातदेखील संघाचे काम सन्मान व प्रेरणेने युक्त असेल अशी भावना व्यक्त केली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Ranveer Singh meets RSS chief Mohan Bhagwat at Sangh headquarters.

Web Summary : Actor Ranveer Singh visited RSS headquarters in Nagpur, meeting Mohan Bhagwat. They discussed various topics. Singh also visited Smritimandir, paying respects at Hedgewar and Golwalkar's memorials. The visit was kept confidential, sparking speculation.
टॅग्स :Ranveer Singhरणवीर सिंगMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूरDhurandharधुरंधर सिनेमा