शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

उपराजधानीत धुळवड जल्लोषात : कोरोना व्हायरसवर गुलालाचे रंग पडले भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 20:42 IST

नागपूरकरांनी होळीच्या दुसऱ्या दिवशी असलेल्या धुळवडीची मजा घेतली. सकाळपासूनच रस्तोरस्ती, घरोघरी गुलाल उधळण्याचा आणि एकमेकांना रंग लावून परंपरेचा जल्लोष संबंध नागपुरात सुरू होता.

ठळक मुद्देतरुण-तरुणींनी केली धम्माल, दुपारच्या सुमारास अघोषित कर्फ्यूजन्य स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगभरात थैमान घालणाऱ्या संसर्गजन्य कोरोना व्हायरसने भारतातही पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. याबाबत नागपूरकर अनभिज्ञ आहेत असे नाही. येथेही दररोज संशयितांची तपासणी सुरूच आहे. अशा भयप्रद वातावरणातही संभावित सर्व उपाययोजना करीत नागपूरकरांनी होळीच्या दुसऱ्या दिवशी असलेल्या धुळवडीची मजा घेतली. सकाळपासूनच रस्तोरस्ती, घरोघरी गुलाल उधळण्याचा आणि एकमेकांना रंग लावून परंपरेचा जल्लोष संबंध नागपुरात सुरू होता.

धुळवडीचा जल्लोष होलिका दहनापासून सोमवारीच सुरू झाला. गुलालाची उधळण, रंग लावण्याची चढाओढ आणि होळी गीतांवर नाचण्याची धम्माल सर्वत्र सुरू होती. दरवर्षीपेक्षा नागरिक रंगांबाबत जरा जास्तच जागरूक असल्याचे दिसून येत होते. रासायनिक रंग, चायनीज पिचकाऱ्या आणि पाण्याचा होणारा मारा यंदा कमीच दिसून आला.

बऱ्याच नागरिकांनी कोरोनाच्या दहशतीमुळे घरीच राहणे पसंत केले. त्यामुळे बाहेर रस्त्यांवर अघोषित कर्फ्यू लागल्याचे दिसून येत होते. या सगळ्यात कमाल केली ती तरुण-तरुणींनी. घोळक्या घोळक्याने मुली-मुले बाईकवर फिरत रंगांची उधळण करताना दिसत होते. नैसर्गिक रंग आणि गुलाल लावून जल्लोष साजरा केला जात होता. एकूणच रंगांमध्ये मिसळून सर्व एक होण्याचा हा सोहळा लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच साजरा केला.पेटत्या होळींभोवती नीरव शांतता

सोमवारी होलिका दहनानंतर अनेकांनी तेथे राहणे टाळल्याचेच दिसून येत होते. कोरोनाच्या दहशतीचाच हा परिणाम म्हणता येईल. धुळवडीला बहुतांश ठिकाणांवर पेटत्या होळींजवळ वस्तीतील नागरिकांची गर्दी असते. मात्र, होळींभोवती नीरव शांतता दिसून येत होती.मुलींचे बाहेर पडणे सुखावणारेधुळवडीला मुली बाहेर पडणे म्हणजे धोक्याचे, असा समज आपल्याकडे आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मुली स्वत: घोळक्याने बाहेर पडताना दिसून येतात. मंगळवारीही अशाच मुली आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत चौकाचौकात रंग खेळताना दिसून येत होत्या. बाईकवरून इतरत्र भटकंती करीत असल्याचे चित्र सुखावह होते. एकमेकांच्या घरी जाऊन रंग खेळण्यासोबतच नाश्त्यावर ताव मारणाऱ्या या युवावर्गाने धुळवडीला एकच जल्लोष केला आणि मुलींनाही असा सोहळा आनंदाने साजरा करण्याचे स्वातंत्र्य प्राप्त झाल्याचे सुखद चित्र होते.

टॅग्स :Holiहोळीcolourरंग