शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

धुलिवंदन : शहरातील चौकाचौकात राहणार पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 23:57 IST

धुलिवंदनाच्या पर्वावर दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या, महिला-मुलींसोबत लज्जास्पद वर्तन करू पाहणाऱ्यांना तसेच सणोत्सवाच्या आनंदाला गालबोट लावू पाहणाऱ्यांना पोलीस चांगला धडा शिकविणार आहेत. धुळवडीच्या आडून कुणी उपद्रव करताना आढळल्यास त्यांची चांगली खातर करा तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या बांधून त्यांचे अवैध गुत्ते उद्ध्वस्त करा, असे कडक आदेश पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व ठाणेदारांना दिले आहेत.

ठळक मुद्देकलम १४४ लागू : पाच उपायुक्त, १० सहायक आयुक्त, २५०० पोलीस सांभाळणार बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धुलिवंदनाच्या पर्वावर दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्या, महिला-मुलींसोबत लज्जास्पद वर्तन करू पाहणाऱ्यांना तसेच सणोत्सवाच्या आनंदाला गालबोट लावू पाहणाऱ्यांना पोलीस चांगला धडा शिकविणार आहेत. धुळवडीच्या आडून कुणी उपद्रव करताना आढळल्यास त्यांची चांगली खातर करा तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या बांधून त्यांचे अवैध गुत्ते उद्ध्वस्त करा, असे कडक आदेश पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व ठाणेदारांना दिले आहेत.नागरिकांना शांततेत आणि उत्साहात होळी-धूळवड साजरी करता यावी म्हणून शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. त्यासाठी सुमारे अडीच हजार पोलीस चौकात राहतील अन् गल्लीबोळात गस्तही करणार आहेत. बुधवारी शहरात ७८७ ठिकाणी सार्वजनिक होळी पेटविण्यात आल्या. धुळवडीच्या दिवशी भल्या सकाळपासून ५ पोलीस उपायुक्त, १० सहायक आयुक्त, ४० पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वात २५०० पोलीस बंदोबस्ताचा मोर्चा सांभाळणार आहेत.दारूच्या नशेत बेदरकारपणे वाहन चालविणारे, गोंधळ घालणारे, महिला-मुलींची छेड काढणारे किंवा कसल्याही प्रकारे उपद्रव करून सणोत्सवाच्या उत्साहाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत. कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे पाचपेक्षा जास्त लोक सार्वजनिक ठिकाणी एकत्रित राहू शकणार नाही. पोलिसांचा चौकाचौकात बंदोबस्त राहील. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असून फिक्स पॉईंटही लावण्यात येणार आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी वाहनांसोबतच पायीदेखील गस्त करतील. बीट मार्शलना अधिक सतर्कतेने गस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे.दारूच्या गुत्त्यांवर खास नजरदारूची दुकाने बंद असल्यामुळे हातभट्टीवाले, अवैध दारू विकणारे मोठा साठा जमवून ठेवतात. या गुत्त्यावर एकाच वेळी दारू घेणाऱ्यांची मोठी गर्दी जमते. त्यात गुन्हेगार मोठ्या संख्येत असतात. हे गुन्हेगार दारूच्या नशेत अवैध शस्त्राच्या धाकावर लुटमार, विनयभंग तसेच अन्य गंभीर गुन्हे करतात. त्यामुळे अवैध दारू गुत्त्यांवर खास नजर ठेवण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी शहरातील पोलिसांना दिले आहे; सोबतच नागरिकांना होळी-धुळवडीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

 

 

टॅग्स :HoliहोळीPoliceपोलिस