धम्माल दांडियाची प्राथमिक फेरी २८ला

By Admin | Updated: November 21, 2014 00:46 IST2014-11-21T00:46:11+5:302014-11-21T00:46:11+5:30

लोकमत सखी मंच आणि कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानच्यावतीने ‘आंतरराज्यीय धमाल दांडिया’चे आयोजन करण्यात आले आहे. दांडिया स्पर्धेची प्राथमिक फेरी’ २८ नोव्हेंबर रोजी कॉटन मार्केट

Dhhamal Dandiya's primary round will be on 28th | धम्माल दांडियाची प्राथमिक फेरी २८ला

धम्माल दांडियाची प्राथमिक फेरी २८ला

आंतरराज्यीय अंतिम फेरी २९ नोव्हेंबरला : चिटणीस पार्क येथे रंगणार स्पर्धा
नागपूर : लोकमत सखी मंच आणि कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानच्यावतीने ‘आंतरराज्यीय धमाल दांडिया’चे आयोजन करण्यात आले आहे. दांडिया स्पर्धेची प्राथमिक फेरी’ २८ नोव्हेंबर रोजी कॉटन मार्केट मार्गावरील गीता मंदिरात सकाळी १० वाजता होईल. तर अंतिम फेरी २९ नोव्हेंबर रोजी चिटणीस पार्क येथे होणार आहे.
या स्पर्धेला विशेष सहकार्य शशिकांत बोदड यांचे लाभले आहे. सहप्रायोजक रायसोनी समूह तर पारितोषिक प्रायोजक ‘युनिक स्लीम पॉर्इंट अ‍ॅण्ड ब्युटी क्लिनीक’ हे आहेत.
लोकमत सखी मंचच्या ‘आंतरराज्यीय धमाल दांडिया’ सोहळ्याची नागपूरकर आतूरतेने वाट पहात असतात. दरवर्षी या सोहळ्याचे थाटात आयोजन होत असते. या स्पर्धेची प्राथमिक फेरी गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पार पडली आहे. आता नागपूरला विदर्भस्तरीय सेमी फायनल आणि अंतिम फेरी होणार आहे.
अंतिम फेरीसाठी चित्रपटसृष्टीतील व संगीत क्षेत्रातील दिग्गज कलावंत आणि सोबतच छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कलाकारांची हजेरी राहणार आहे. या सोहळ्यात संगीतमय कार्यक्रम हे आकर्षण ठरणार आहे.
पहिल्या फेरीसाठी नोंदणी उद्या शुक्रवारपासून कार्यालयात सुरू होत आहे. यात १२ ते १६ सदस्यांचा समूह (मुले किंवा मुली) समाविष्ट होऊ शकतात. १२ मिनिटांचे प्रत्यक्ष सादरीकरण आणि स्पर्धेच्या तयारीसाठी ३ मिनिट अशा एकूण १५ मिनिटांचा वेळ दिला जाईल. स्पर्धेची सीडी स्पर्धकांना आणावयाची आहे. स्पर्धकांचे वय १५ वर्षावरील असावे. स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. काही तांत्रिक अडचण आल्यास लोकमत सखी मंच जबाबदार राहणार नाही. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाला ५०० रुपये शुल्क भरावे लागेल. मागील वर्षी विजेता संघाला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही, आदी स्पर्धेचे नियम आहेत.
नोंदणी सखी मंच कार्यालयात सुरू आहे. २९ तारखेच्या कार्यक्रमासाठी वाचत रहा ‘लोकमत’, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नेहा जोशी यांना २४२९३५५ किंवा ९८५०३०४०३७ या क्रमांकावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)

Web Title: Dhhamal Dandiya's primary round will be on 28th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.