शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

धनवटे रंगमंदिर : जुने पाडले, नवे तयार होण्यास लागले तब्बल २६ वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 22:47 IST

झाशी राणी चौक, सीताबर्डी येथे सध्या उभी असलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या संकुलात उभारण्यात येत असलेले धनवटे रंगमंदिर तयार होण्यास तब्बल २६ वर्षाचा काळ उलटला असला तरी, अद्याप उद्घाटनाचा मुहूर्त काही सापडत नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देशासकीय फाईल्समध्ये अडकलाय उद्घाटनाचा मुहूर्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झाशी राणी चौक, सीताबर्डी येथे सध्या उभी असलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या संकु लात उभारण्यात येत असलेले धनवटे रंगमंदिर तयार होण्यास तब्बल २६ वर्षाचा काळ उलटला असला तरी, अद्याप उद्घाटनाचा मुहूर्त काही सापडत नसल्याचे दिसून येत आहे.धनवटे रंगमंदिर म्हणजे जुन्या पिढीसाठी स्मृतींचा खजिना आणि नव्या पिढीसाठी अदृश्य असा इतिहास. १९५२ सालापासून सुरू झालेल्या या रंगमंदिराचा डोलारा काहीच वर्षात उभा झाला. अनेक नाटके, संगीत नाटके, शास्त्रीय संगीताच्या मैफली, थोरामोठ्यांची व्याख्याने इथे रंगली. मात्र, १९९२-९३ साली तब्बल तीन-साडेतीन दशके दिमाखाने उभा असलेला हा आनंदी अभिव्यक्तीचा डोलारा नव्या व्यावसायिक ध्येयधोरणामुळे जमीनदोस्त झाला. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी २९ डिसेंबर १९९३ रोजी नव्या वास्तूचा शिलान्यास केला आणि अवघ्या दोन वर्षात ही वास्तू आणि धनवटे रंगमंदिर पुन्हा डौलाने उभे राहील, असे आश्वासन दिले. मात्र, राजकीय आश्वासने दिवास्वप्ने असतात, हे त्याच वेळी सिद्ध झाले आणि तब्बल २६ वर्षे लोटली तरी अद्यापही ही वास्तू निर्माणाधीन आहे. विदर्भ साहित्य संघ सांस्कृतिक संकुलाचे पाच, सहा व सात मजले हे धनवटे रंगमंदिरासाठीचे आहेत. दोन वर्षापूर्वी याच निर्माणाधीन रंगमंदिरात विदर्भ साहित्य संघाचा वर्धापनदिन सोहळा साजरा झाला होता. फिनिशिंग, खुर्च्यांची कामे, लायटिंगची कामे तेव्हा सुरू होती. तेव्हा लवकरच उद्घाटनाचा मुहूर्त जाहीर केला जाईल, असे सांगितले जात होते. मात्र, त्याही घटनेला दोन-अडीच वर्षे उलटून गेली. अद्याप वि.सा. संघाला उद्घाटनाचा मुहूर्त सापडत नसल्याचे दिसत आहे. काही शासकीय अटींची पूर्तता होणे बाकी असल्याच्या कारणाने, उद्घाटनाला मुहूर्त सापडत नसल्याचे सांगितले जात आहे.बरीच कामे अर्धवट अवस्थेतशिलान्यासाला २६ वर्षे लोटली आहेत. या संकुलाच्या बांधकामाचे कंत्राट शेवाळकर बिल्डर्सकडे देण्यात आले आहे. आराखड्यानुसार संकुलाचे खालचे तीन मजले व्यावसायिक धोरणासाठी तर वरचे चारही मजले विदर्भ साहित्य संघाच्या उपक्रमांसाठी आहेत. त्याअनुषंगाने वि.सा. संघाच्या जागेत कलादालन, ध्वनिमुद्रणाचा स्टुडिओ, कार्यालय तयार झाले आहेत. मात्र, सातव्या मजल्यावरील मुख्य रंगमंदिर, टेरेस गार्डन, अ‍ॅम्पी थिएटर अजूनही अर्धवट अवस्थेत आहेत.घोषणाही गेली अन् नाट्य संमेलनही गेले२०१४ साली राज्यस्तरीय लेखिका संमेलनाच्या अनुषंगाने धनवटे रंगमंदिराचे लोकार्पण होईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, ती घोषणा हवेतच विरली. त्यानंतर फेब्रुवारी २०१९ रोजी नागपुरात ९९ वे अ.भा. मराठी नाट्य संमेलन पार पडले. नाट्यवर्तुळात नाट्य संमेलनामध्येच धनवटे रंगमंदिराच्या वास्तूचे लोकार्पण व्हावे, अशी चर्चा निर्माण झाली होती. मात्र, कामे अपुरेच असल्याने आणि शासकीय कचेरीत कागदपत्रे अडकली असल्याने, शिवाय अनेक परवानग्यांची पूर्तता होऊ न शकल्याने, तोही मुहूर्त टळला.

 

टॅग्स :NatakनाटकTheatreनाटकnagpurनागपूर