शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात धनत्रयोदशी १०० कोटींची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 23:06 IST

धनत्रयोदशीचा शुभमुहूर्त साधून सराफा बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. सराफा बाजारात १०० कोटींची उलाढाल झाल्याची माहिती सराफांनी दिली.

ठळक मुद्देसराफांकडे सोने खरेदीसाठी गर्दी : ग्राहकांचा दागिन्यांच्या बुकिंगवर भर

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : देशभरात दिवाळीच्या उत्सवाची लगबग सुरू आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या धनत्रयोदशीला घरातील पारंपरिक दागिन्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यासोबतच संचित धनात वृद्धी व्हावी, यासाठी बाजारातून सोने खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. त्यामुळे धनत्रयोदशीचा शुभमुहूर्त साधून सराफा बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. सराफा बाजारात १०० कोटींची उलाढाल झाल्याची माहिती सराफांनी दिली. शुक्रवारी जीएसटी वगळता १० ग्रॅम सोने ३८,८०० आणि चांदीचे भाव ४६,५०० रुपयांवर होते. गुरुवारच्या तुलनेत सोने ४०० रुपये आणि चांदीचे भाव एक हजार रुपयांनी वाढले.दिवाळीच्या उत्साहावर कुठेही विरजण पडल्याचे बाजारपेठेत फेरफटका मारले असता जाणवले नाही. दिवाळीच्या सणांमध्ये सोन्या-चांदीची खरेदी करण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. धनत्रयोदशी आणि दिवाळी पाडव्याच्या दिवशी सोने-चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते. सध्या सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता अनेकांनी आधीच बुकिंग करून ठेवले आहे. नागपुरात जवळपास १२ मोठ्या शोरूम आणि तीन हजारांपेक्षा जास्त सराफांची दुकाने आहे. या सर्वच दुकानात ग्राहकांची गर्दी होती.लोक धनत्रयोदशीला एकतरी ग्रॅम सोन्याची खरेदी करतात. त्यामुळे धनत्रयोदशीला सोने-चांदीची उलाढाल कोट्यवधींची असते. सराफा बाजारपेठेतील व्यावसायिकांच्या मते, गेल्या पाच वर्षांतील ट्रेण्ड बघितला तर दिवाळीनंतर म्हणजे तुळशीपूजनानंतर लग्नसराई सुरू होत असल्याने सोन्याचे दर कमी होत नाही, तर वाढतात. त्यामुळे बरेचदा आधीच खरेदी करून ठेवण्यावर भर असतो. यंदाही असेच चित्र असल्याने नागरिकांची सोने खरेदीची लगबग सुरू झाली आहे. मुहूर्ताला सोनेखरेदी बरोबरच नव्या वस्तूंच्या खरेदीचे प्रमाण अजूनही कायम आहे. त्यामुळे बरेचदा धनत्रयोदशी किवा ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बाजारात होणारी गर्दी बघता आधीच बुकिंग करून ठेवण्यावर ग्राहकांचा भर असतो.धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या मुहूर्तासाठी सराफांनी पारंपारिक आणि आधुनिक डिझाईनचे दागिने प्रदर्शित केले आहेत. वजनात हलके आणि जड दागिने आहेत. ग्राहकांना एक ग्रॅमपासून तोळ्यांपर्यंत खरेदीची संधी आहे. यावर्षी धनत्रयोदशीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सराफांनी सांगितले.अपेक्षेपेक्षा जास्त गर्दीयावर्षी धनत्रयोदशीला अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होती. तसे पाहता शनिवार आणि रविवार सुटी असल्यामुळे धनत्रयोदशी तीन दिवस असल्याचे म्हणता येईल. सर्वच शोरुममध्ये खरेदीसाठी गर्दी होती. ग्राहकांनी सोने खरेदीसह दागिन्यांचे बुकिंग केले.राजेश रोकडे, संचालक, रोकडे ज्वेलर्स.

टॅग्स :DiwaliदिवाळीGoldसोनंnagpurनागपूर