शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पाच जणींच्या मृत्युमुळे धामना गाव शोकाकुल; स्फोटाचे हादरे, घराघरात, मनामनात

By नरेश डोंगरे | Updated: June 13, 2024 22:51 IST

महिला-मुलींना आक्रोश अनावर, शोकसंतप्त गावकऱ्यांची अवस्था शब्दातीत

नागपूर : घरातील चुल पेटविण्यासाठी स्फोटकांच्या कारखान्यात काम करणाऱ्या गावातील पाच तरुणींचा गुरुवारी दुपारी भीषण स्फोटात करुण अंत झाला. त्यामुळे उभे धामना गावच हबकले आहे. या स्फोटाचे हादरे धामना गावातील घराघराला आणि मनामनाला बसले असून गावातील महिला-पुरुष, आबालवृद्ध सारेच सुन्न पडल्यासारखे झाले आहेत.

नागपूर-अमरावती मार्गावर हे चार ते पाच हजार लोकवस्तीचे धामना हे ईवलेसे गाव आहे. गावातील बहुतांश मंडळी शेतकरी, शेतमजूर आहेत. शिकून सवरूनही रोजगार मिळत नसल्याने आणि शहरात येऊन कामधंदा करणे शक्य नसल्याने गावातील सुमारे ७० ते ८० जण चामुंडी एक्सप्लोसिव्ह प्रा. लि. कंपनीत कामाला जातात. त्यात तरुण-तरुणींचीही संख्या मोठी आहे. सकाळी ७ ते ३ आणि दुपारी ४ ते १२ अशा दोन शिफ्टमध्ये कंपनीत स्फोटक हाताळणीच्या वेगवेगळ्या विभागात काम चालते.

नेहमीप्रमाणे गावातील प्रांजली किसन मोदरे (२२), वैशाली आनंदराव क्षीरसागर (२०),प्राची श्रीकांत फलके (१९), शितल आशिष चटप (वय २८) आणि मोनाली शंकरराव अलोने (२५) या पाच जणी अन्य महिलांसह भल्या सकाळीच गुुरुवारी घरून कंपनीत कामासाठी निघाल्या. दुपारी १२ ते १ च्या अवधीत अनेक जण जेवणासाठी सुटी (लंच ब्रेक) घेतात. मात्र, प्रांजली, वैशाली, प्राची, शितल आणि मोनाली यांनी काम हातावेगळे करून जेवण करण्याचा विचार केला असावा, तोच त्यांच्यासाठी जिवघेणा ठरला. भयानक स्फोट झाला अन् त्या पाचही जणींचा मृत्यू झाला.

या पाचही जणींचे घर गावातील वेगवेगळ्या भागात आहे. त्यांचे मृत्यू झाल्याचे वृत्त गावात धडकले अन् त्यांच्या घरात एकच आक्रोश निर्माण झाला. नातेवाईकांसोबतच घराघरात बायबापड्यांचे हुंदके ऐकू येऊ लागले. मृत तरुणीं गावातील कुणाच्या नातेवाईक तर कुणाच्या मैत्रीणी होत्या. संपूर्ण गावच एकमेकांना ओळखत असल्याने एकाच दिवशी गावातील तरुणींच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरवली. कामधंदा सोडून गावकरी तरुण मंडळी कारखाना परिसराकडे रोष व्यक्त करण्यासाठी धावले. तर, ईकडे आबालवृद्ध, महिला मृतक तरुणींच्या घरासमोर घोळका करून शोक व्यक्त करू लागल्या. त्या सर्वांची स्थिती शब्दातील होती अन् गावात पसरलेली शोककळा काळजात धस्स करणारी होती.