धमाल दांडिया विशेष
By Admin | Updated: December 3, 2015 03:27 IST2015-12-03T03:27:16+5:302015-12-03T03:27:16+5:30
उत्साहाला आलेली भरती...प्रचंड जल्लोष... तरुणाईने दिलेली मनसोक्त दाद... कार्यक्रमस्थळी युवक-युवतींनी तालावर धरलेला फेर आणि नृत्याच्या रंगात रंगलेले ...

धमाल दांडिया विशेष
नागपूर : उत्साहाला आलेली भरती...प्रचंड जल्लोष... तरुणाईने दिलेली मनसोक्त दाद... कार्यक्रमस्थळी युवक-युवतींनी तालावर धरलेला फेर आणि नृत्याच्या रंगात रंगलेले आबालवृद्ध. रंगीबेरंगी प्रकाशझोतांनी उजळलेला आसमंत अन् अत्याधुनिक ध्वनियंत्रणेवर वाजणारा ढोल. नृत्याच्या वातावरणाने भारलेल्या वातावरणात लोकमत सखी मंचच्या आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेची अंतिम फेरी रंगली.
धमाल दांडियाच्या अंतिम फेरीत लोकमत सखी मंचच्या २०१६ च्या ओळखपत्राचे लोकार्पण करताना अनुक्रमे कोरिओग्राफर किरण भेले, कोरिओग्राफर राजेश सेदानी, कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत बोदड, लोकमतचे प्रेसिडेन्ट (सेल्स) करूण गेरा, लोकमतचे इव्हेण्ट हेड (महाराष्ट्र) बी. बी. चांडक, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन खासदार विजय दर्डा, प्रख्यात अभिनेता रणवीर सिंह, प्रख्यात गायिका साधना सरगम, जैन सहेली मंडळाच्या कोषाध्यक्ष अनुजा छाजेड़, स्टार प्रवाहची अभिनेत्री ऋता दुरगुले, युनिक स्लिम पॉइंट अॅन्ड ब्यूटी क्लीनिकच्या संचालिका रिचा जैन, प्रख्यात गायक व अभिनेता अरविंद वेगडा, आ. प्रकाश गजभिये, वात्सल्य ग्रुपचे अमित गाडगे, आयएनआयएफडीचे आदित्यवर्धन अग्रवाल आणि लोकमतचे ग्रुप इव्हेण्ट मॅनेजर नितीन नौकरकर.