शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

तिबेटच्या मुक्तीसाठी धम्म पदयात्रा रवाना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 20:53 IST

तिबेटच्या मुक्तीसाठी दीक्षाभूमी ते धर्मशाला अशा दोन हजार किमीचा पायी प्रवास करणारे भंते रेवत यांनी दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन तसेच बुद्धमूर्तीला अभिवादन करून पुढच्या प्रवासाला सुुरुवात केली. यावेळी तिबेटियन नागरिकांच्यावतीने भंते रेवत यांचे पारंपरिक स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

ठळक मुद्देदीक्षाभूमी ते धर्मशाला धम्मपदयात्रा : तिबेटियन नागरिकांनी भंते रेवत यांचे केले स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तिबेटच्या मुक्तीसाठी दीक्षाभूमी ते धर्मशाला अशा दोन हजार किमीचा पायी प्रवास करणारे भंते रेवत यांनी दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन तसेच बुद्धमूर्तीला अभिवादन करून पुढच्या प्रवासाला सुुरुवात केली. यावेळी तिबेटियन नागरिकांच्यावतीने भंते रेवत यांचे पारंपरिक स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी रिजनल तिबेटियन युथ काँग्रेसचे (गोठणगाव) संयोजक भंते लामा लोंबसांग टेम्बा, कॅलसँग, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय निमंत्रक अशोक बोंदाडे, सुनील सारिपुत्त, भंते अभय नायक, संदेश मेश्राम, शंकर माणके, कांचन वासनिक प्रामुख्याने उपस्थित होते.भंते रेवत यांनी चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवरून धम्मपदयत्रेला सुरुवात केली. हिमाचल प्रदेशतील धर्मशालापर्यंत ते पायी प्रवास करणार आहेत. नागपुरात दाखल झाल्यावर त्यांनी अनेक स्थळांना भेटी दिल्या. तसेच भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक अ‍ॅड. विमलसूर्य चिमणकर यांच्यासह अनेकांशी चर्चाही केली. आपल्या प्रवासात ते अशाच पद्धतीने विविध ठिकाणच्या बौद्ध स्थळांना भेटी देत मन्यवरांशी चर्चा करतील. काही ठिकाणी परिसंवाद आयोजित करून तिबेटच्या मुक्तीसाठी जनजागृती करतील. नागपूरवरून ते भोपाळ, आगरा, दिल्ली, अमृतसर मार्गे हिमाचल प्रदेशातील धर्मशालात पोहोचतील.आम्ही सुखात पण तिबेटियन दु:खीचीनने तिबेटवर अतिक्रमण केले. आम्ही भारतात आलो. भारताने आम्हाला केवळ आसराच दिला नाही तर भरपूर प्रेमही दिले. आम्ही तिबेटियन भारतात अतिशय सुखी आहोत. परंतु तिबेटमध्ये राहणारे आमचे बांधव मात्र दु:खी जीवन जगत आहेत. आम्ही सर्व तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत. भंते रेवत यांनी पुढाकार घेत तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी पदयात्रा काढली, त्याचे आम्ही मनापासून स्वागत करतो. त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करू.भंते लामा लोबसांगसंयोजक, रिजनल , तिबेटियन यूथ काँग्रेस (गोठणगाव)

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीMorchaमोर्चा