नरेश डोंगरेनागपूर : पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी गुरुवारी राज्यातील शीर्षस्थ पोलीस अधिकाऱ्यांसोबत ऑनलाइन चर्चा ( व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) केल्यानंतर आज शुक्रवारी गृह विभागाकडून पोलीस बदलीच्या संबंधाने एक आदेश काढण्यात आला. त्यानुसार बदलीसाठी पात्र असलेल्या राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आता गणेशोत्सवाचा बंदोबस्त आटोपल्यानंतरच केल्या जाणार आहेत.बदलीसाठी पात्र आणि उत्सुक असलेल्या राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उत्कंठता ताणून धरणारा हा विषय गेल्या पंधरा दिवसांपासून मंत्रालयात आणि राज्य पोलीस दलात चर्चेला आला आहे. अनेक अधिकारी पाहिजे त्या ठिकाणी आपली नियुक्ती करून घेण्यास उत्सुक आहे. तर अनेक अधिकारी आहे त्याच ठिकाणी राहता यावे म्हणूनही फिल्डिंग लावून आहेत. या पार्श्वभूमीवर सत्तेतील तीनही पक्षाच्या नेत्यांकडून एकाच जागेसाठी वेगवेगळे नाव देण्यात आलेले आहे. दुसरीकडे पोलीस महासंचालनालयातूही कोणत्या अधिकाऱ्याला कुठे नियुक्त करायचे, यासंबंधीची यादी तयार झाली होती. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर एकमत होऊ शकले नाही.परिणामी बदलीसाठी तयारी करून बसलेले अनेक अधिकारी दिवस मोजल्या सारखे करीत होते. मतभिन्नतेच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी गुरुवारी राज्यातील शीर्षस्थ पोलिस अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन आगामी गणेशोत्सव, १५ ऑगस्ट बंदोबस्ताबाबत चर्चा केली. व्हीसीत बदलीचाही विषय प्रमुख्याने चर्चेला होता. तूर्त कोणतेही बदल्या होणार नाही असे संकेत त्यांनी या व्हीसीमध्ये दिले होते. त्याची चर्चा असतानाच शुक्रवारी गृह विभागाकडून उपसचिव कैलास गायकवाड यांनी एक सूचनापत्र मुंबई पोलीस आयुक्त वगळता राज्यातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पाठविले. त्या पत्रात कोविड-१९ चा हवाला देत राज्य पोलीस सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी दिलेली मुदत शासन निर्णयाद्वारे ५ सप्टेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.---सर्व लागले आपापल्या कामीगृह विभागाने काढलेल्या आजच्या या आदेश वजा सूचना पत्रानुसार आतापर्यंत बदलीसाठी आस लावून असलेले पोलीस अधिकारी आपआपल्या कामी लागले आहेत. विशेष म्हणजे लोकमत'ने १० ऑगस्ट आणि १४ ऑगस्ट रोजी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचे वृत्त प्रकाशित करून अनिश्चितता उघड केली होती.
डीजींची व्हीसी आणि गृहखात्याचा आदेश; आधी गणेशोत्सव बंदोबस्त, नंतर बदलीचा विषय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 21:40 IST