शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अनिर्मित तंबाखू निर्मात्यावर डीजीजीआयची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 20:24 IST

चुना लावून हातावर मळून थेट खाण्यात येणारा तंबाखू अर्थात अनिर्मित तंबाखूच्या एका निर्मात्यावर जीएसटी चोरी प्रकरणात गुप्तचर जीएसटी महासंचालनालयाच्या (डीजीजीआय), नागपूर झोनल युनिटने मोठी कारवाई केली आहे.

ठळक मुद्दे१.७५ कोटींचे जीएसटी चोरी प्रकरण : तंबाखूवर ९९ टक्के कर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : चुना लावून हातावर मळून थेट खाण्यात येणारा तंबाखू अर्थात अनिर्मित तंबाखूच्या एका निर्मात्यावर जीएसटी चोरी प्रकरणात गुप्तचर जीएसटी महासंचालनालयाच्या (डीजीजीआय), नागपूर झोनल युनिटने मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई डीजीजीआय नागपूर युनिट आणि नाशिक विभागीय युनिटने संयुक्तरीत्या केली. यात १.७५ कोटींच्या जीएसटी (वस्तू व सेवा कर) चोरीचा खुलासा झाला आहे.माहितीच्या आधारे डीजीजीआयच्या दहा सदस्यीय चमूने १४ आणि १५ जुलैला जळगाव येथील प्रमुख अनिर्मित तंबाखूच्या निर्मात्याचे मुख्य व्यावसायिक स्थळ आणि दोन युनिटवर छापे टाकले. विचारपूस केल्यानंतर निर्मात्याने सांगितले की, गुजरात येथून तंबाखू मागवितो. तंबाखू एक युनिटमध्ये वाळविल्यानंतर दुसऱ्या युनिटमध्ये पॅकिंग करण्यात येते. याकरिता जीएसटी इनव्हाईस जारी करण्यात येते. परंतु या प्रतिष्ठानांतून जप्त केलेल्या कागदपत्रांची बारकाईने चौकशी केल्यानंतर अनेक बाबींचा खुलासा झाला. हा करदाता जीएसटीविना इनव्हाईस जारी करून आपल्या शाखांच्या माध्यमातून थेट अनिर्मित तंबाखूचा व्यवसाय करून जीएसटीची चोरी करीत असल्याचे स्पष्ट झाले. पण तो कागदपत्रांमध्ये आपल्या मुख्य व्यावसायिक स्थळांमधून युनिटमध्ये तंबाखूचा पुरवठा करीत असल्याचे दर्शवित होता.प्रारंभिक तपासणी आणि चौकशीत अनिर्मित तंबाखू निर्मात्याने १.७५ कोटी रुपयांची जीएसटी चोरी केल्याचा खुलासा झाला. अशा स्थितीत संबंधित व्यावसायिकाने डीजीजीआय चमूला जागेवरच ५० लाख रुपयांच्या जीएसटीचे भुगतान केले. पुढील काही दिवसात होणाºया चौकशीत ३ ते ४ कोटी रुपयांची जीएसटी चोरीचा खुलासा होण्याची शक्यता चमूने व्यक्त केली.सर्वाधिक करांमुळे चोरीच्या मार्गाचा अवलंबतंबाखूवर ९९ टक्के जीएसटी वसूल करण्यात येतो. यामध्ये २८ टक्के जीएसटी आणि ७१ टक्के अन्य संबंधित कर वसूल करण्यात येतो. सर्वाधिक कर वसुलीमुळे तंबाखू निर्मात्याने चोरीचा मार्ग अवलंबला. सिगारेटवर १५० टक्के कर वसूल करण्यात येतो.

टॅग्स :raidधाडnagpurनागपूर