शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू दहशतवादाची थिअरी बनवली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काॅंग्रेसवर टीका

By आनंद डेकाटे | Updated: August 1, 2025 15:01 IST

Nagpur : युपीएने मताच्या राजकारणासाठी हिंदू दहशतवादाची थिअरी बनवली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २००८ सालच षडयंत्र आता सर्वांसमोर उघड झालय. त्यावेळच्या युपीए सरकारने मतांच्या राजकारणासाठी हिंदू टेरर, भगवा दहशतवाद हे शब्द तयार केले. हिंदू दहशतवादाची थिअरी बनवली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली.

वारंगा येथे कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी त्यांना मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात माजी एटीएस अधिकाऱ्याच्या वक्तव्याबाबत विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, १९९० च्या दशकाच्या शेवटच्या भागात आणि साधारणत: २००० च्या सुरुवातीला संपूर्ण विश्वात मोठ्या प्रमाणात दहशतवादी घटना घडल्या. अमेरिका, युरोपमध्ये दहशतवादाच्या घटना घडल्या. भारतात तर घडतच होत्या. यातल्या अनेक घटनांचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत होते. त्यातून इस्लामिक टेररिजमच नरेटिव तयार झालं. ते भारताने तयार केलं नव्हतं” “भारतात या नरेटिवचा आपल्या वोटबँकेवर परिणाम होतोय हे काँग्रेसच्या लक्षात आलं. कोणीच सर्व मुस्लिमांना दहशतवादी ठरवलं नव्हतं. पण तरीदेखील या ठिकाणी सर्व हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचं यूपीएने षडयंत्र रचलं. हिंदू दहशतवाद हा शब्द तयार केला. आम्हाला मतदान करणारे जे लोक आहेत, त्यांच्या मनात राग निर्माण होऊ नये किंवा त्यांना वाटावं आम्ही बॅलन्स करतोय, यासाठी हिंदू दहशतवादाची थिअरी बनवण्यात आली. लोकांना अटक केली. हिंदुत्ववादी संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकारी, पदाधिकारी यांना टार्गेट करण्याचं हे षडयंत्र होतं. त्यासाठी भरपूर प्रयत्न करण्यात आले. परंतु अधिकाऱ्यांना ठोस पुरावे मिळाले नाही. अनेक अधिकारी असे होते, ज्यांच्यावर भरपूर दबाव टाकण्यात आला. त्यांनी सुद्धा सांगितलं आम्ही असं बेकायद काम करणार नाही. हे षडयंत्र हळूहळू बाहेर येत असल्याचेही ते म्हणाले.

यापुढे मंत्र्यांचा बेशिस्तपणा खपवून घेणार नाहीमाणिकराव कोकाटे यांच्या खातेबदलाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, जी काही घटना घडली त्यामुळे लोकांमध्ये रोष होता. त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली. चर्चेअंती त्यांच खातं बदलण्याचा निर्णय घेतला. परंतु यापुढे मंत्र्यांचे बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. कारवाई होणार असेही त्यांनी स्पष्ट केले.आणखी खातेबदल होणार का? असे विचारले असता याबाबत कुठलीही चर्चा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेसMalegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोटnagpurनागपूर