शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

फडणवीस यांची नागपूरला दिवाळी भेट, रेल्वेस्थानकाचा कायापालट होणार; ४८७ कोटींचे कार्यादेश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2022 10:42 IST

अत्याधुनिक सुविधांनी सुसज्जित होणार स्थानक : नागपूर ते मुंबई ‘हायस्पीड ट्रेन’च्या प्रस्तावावरदेखील चर्चा

नवी दिल्ली/ नागपूरकेंद्र सरकारने नागपूरकरांना दिवाळी भेट दिली असून नागपूर रेल्वेस्थानकाचा कायापलट करणारी योजना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या भेटीत मार्गी लागली आहे. 

नागपूर रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास आणि आधुनिकीकरणासाठी ४८७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्या कार्यदेशाची प्रत रेल्वेमंत्र्यांनी फडणवीस यांना मंगळवारी सुपूर्द केली.  महत्त्वाची बाब म्हणजे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जोडून ‘हायस्पीड ट्रेन’ सुरू करण्याच्या प्रस्तावावरदेखील केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून विचार सुरू आहे. रेल्वे मंत्रांसोबत भेटीनंतर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, की नागपूर रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास व आधुनिकीकरणासाठी अखेर कार्यादेश जारी झाले आहेत. यामुळे रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक सोयीसुविधा निर्माण होतील व स्थानक आणखी भव्य होईल.

नागपूर रेल्वेस्थानकाच्या योजनेला हेरिटेज संवर्धन समितीने मान्यता दिली आहे. गर्दीच्या वेळेत क्रॉस-मूव्हमेंट आणि गोंधळ कमी करणे तसेच रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची कोंडी होऊ नये, यावर यात भर देण्यात येणार आहे.

नागपूर रेल्वेस्थानकावर हे होतील बदल

  • हेरिटेज दर्जा असलेल्या नागपूर रेल्वेस्थानकाच्या आजूबाजूच्या इमारती पाडून स्टेशन भव्य बनवण्यात येणार आहे.
  • येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असतील.
  • गाड्यांचे फलाट अचानक बदलल्यानंतर होणारी धावपळ टाळण्यासाठी प्लॅटफॉर्मवर ओव्हरहेड कॉन्कोर्स बांधण्यात येणार आहेत.
  • रेल्वेस्थानक प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल. 
  • वेटिंग रुम्स व बसण्याची क्षमता वाढणार.
  • दुचाकी व चारचाकी पार्किंगची क्षमतादेखील वाढणार.
  • ३० लिफ्ट्स व २६ एस्केलेटर बांधणार
  • स्थानकावरील प्रवासी क्षमता ९ हजार ७०० पर्यंत नेणार.

रेल्वेमंत्र्यांनी दिली कार्यादेशाची प्रत

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कार्यादेशाची प्रत दिली. हे मोठे पाऊल असून, यामुळे रेल्वेस्थानकात प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. सामाजिक-आर्थिक विकासालाही गती मिळेल. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आपण सातत्याने प्रयत्न करत असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. तसेच नागपूरकरांच्या वतीने रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले.

हायस्पीड ट्रेनबाबत रेल्वेमंत्र्यांशी चर्चा

नागपूर-मुंबई समृद्धी एक्स्प्रेस वेचे उद्घाटन लवकरच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गालगत हायस्पीड ट्रेन आणि हायस्पीड कार्गो ट्रेनच्या प्रस्तावालाही वेग आला आहे. याबाबत रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. याबाबत सकारात्मक विचार करून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसrailwayरेल्वेGovernmentसरकारnagpurनागपूरAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव