शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"घरी बसून राजकारण करणाऱ्या व्यक्तीनं मला शिकवू नये, नाहीतर..."; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 15:33 IST

ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

नागपूर-

ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. उद्धव ठाकरेंनी यावेळी फडणवीसांचा उल्लेख लाचार गृहमंत्री असा केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. घरी बसून राजकारण करणाऱ्या व्यक्तीनं मला शिकवू नये. नाहीतर मी बोलायला लागलो तर तुमची पळता भुई थोडी होईल, असं फडणवीस म्हणाले. 

फडणवीसांना गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही, राजीनामा द्या; रोशनी शिंदे मारहाणीवरून उद्धव ठाकरे संतापले

"उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेल्या फ्रस्ट्रेशनला खरंतर उत्तर द्यायची काहीच गरज नाही. त्यांच्यापेक्षा खालच्या भाषेत मलाही बोलता येतं. मी नागपूरचा आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं. पण मी खालची भाषा वापरणार नाही. एकच सांगेन मला बोलायला लावू नका नाहीतर तुमची पळता भुई थोडी होईल. मोदींचा फोटो लावून निवडून आले आणि खुर्चीसाठी कुणी लाचारपणा केला हे महाराष्ट्राला माहित आहे. कोरोनाकाळात घरी बसून राजकारण करणाऱ्यांनी मला शिकवू नये", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

चाणक्यांच्या वाक्याच्या दिला दाखला"चाणक्य यांचं एक चांगलं वाक्य आहे. राज्यातील चोर, डाकू, लुटेरे जेव्हा राजाच्या विरोधात बोलतात तेव्हा समजून जायचं की राजानं योग्य काम सुरू केलं आहे. मी काही राजा नाही. पण डाकू, लुटेऱ्यांची बडबड सुरू झाली आहे. मी याआधीही पाच वर्ष राज्याचं गृहमंत्रीपद सांभाळलं आहे. आता काहींना मी गृहमंत्रीपदी नकोय म्हणून अनेकांच्या पोटात दुखतंय. राज्यात जो जो चुकीचं काही करेल आणि कारवाईस पात्र असेल त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही", असं फडणवीस म्हणाले. 

उद्धव ठाकरे काय म्हणाले?ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जनतेशी प्रामाणिक राहून गृहमंत्री फडणवीस यांनी तातडीनं राजीनामा द्यायला हवा. महिलांचा सन्मान हे काही नुसतं बोलून होत नाही. उगाच फुकाच्या यात्रा काढू नका. तुमच्यात जर आरोपींवर कारवाई करण्याची हिंमत नसेल तर राजीनामा द्या, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ते ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे