शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्यांक मतं मिळवण्याकरता भीती निर्माण करण्याचं काम, शालेय अभ्यासक्रम बदलांवरील आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2022 12:27 IST

अलिकडच्या काळात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमध्ये अल्पसंख्यांक मतं मिळवण्याकरता एक चढाओढ लागली असून त्यातून अशी कवकवी येत, असेही फडणवीस म्हणाले.

नागपूर : देशातील विविध प्रकारच्या शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून भाजप मुलांच्या मनात विष पेरत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जो काही अभ्यासक्रम आहे हा पूर्वीपासून चालत आलेला आहे. त्यात वेळोवेळी तज्ज्ञांनी वेळोवेळी बदल केले आहेत. केवळ अल्पसंख्यांकाची मत मिळवण्याकरता, त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचं काम, काही नेते करत आहेत, असे फडणवीस म्हणाले. नुकतंच, एका कार्यक्रमादरम्यान बोलताना शरद पवार, जेव्हापासून भाजपचे सरकार आले तेव्हा संपूर्ण देश एकाच धर्माचा असावा असा प्रयत्न केला जात आहे. भाजप देशातील अभ्यासक्रम बदलवून लहान मुलाच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे म्हणाले होते. यावर फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी यावेळी शालेय अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली. अलिकडच्या काळात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमध्ये अल्पसंख्यांक मतं मिळवण्याकरता एक चढाओढ लागली असून त्यातून अशी कवकवी येत, असेही फडणवीस म्हणाले.

जे काही कायदेशीर आहे ते कायद्याने होईल, आणि तेच ईडी करतेय

नागपूरमधील विधीज्ञ सतीश उके यांच्या घरावर ईडीने धाड टाकल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले, मला या प्रकरणाची काही कल्पना नाही, मी देखील माध्यमांमध्येच बघितलं आहे की, जमीनीच्या प्रकरणांमध्ये नागपूर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मूळ तक्रार ही नागपूर पोलिसांची असून त्याच्याआधारे ईडीने कारवाई केली आहे. त्यांच्यावर २००५ पासून विविध एफआयआर दाखल आहेत. त्यांना न्यायाधिशांची खोटी तक्रार केल्याप्रकरणीही शिक्षा झालेली आहे. त्यामुळे, जे काही कायदेशीर आहे ते कायद्याने होईल, आणि तेच ईडी करतेय, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणEducationशिक्षणStudentविद्यार्थीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारBJPभाजपा