Devendra Fadnavis in JMFC court today? | देवेंद्र फडणवीस आज जेएमएफसी न्यायालयात?
देवेंद्र फडणवीस आज जेएमएफसी न्यायालयात?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अ‍ॅड. सतीश उके यांच्याद्वारे दाखल फौजदारी प्रकरणामध्ये जारी समन्सनुसार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एस. डी. मेहता यांच्या न्यायालयात व्यक्तीश: हजर व्हायचे आहे. परंतु, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फडणवीस बुधवारी नागपुरात नाहीत. त्यामुळे त्यांच्यावतीने न्यायालयात उपस्थित राहण्यापासून सूट मिळण्याचा अर्ज सादर केला जाऊ शकतो.
फडणवीस यांनी २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातून नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. त्या नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी दोन न्यायप्रविष्ट फौजदारी प्रकरणांची माहिती दिली नाही. त्यांनी ही कृती जाणीवपूर्वक केली. त्यामुळे त्यांच्यावर लोकप्रतिनिधीत्व कायद्यातील कलम १२५-ए अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी विनंती उके यांनी या प्रकरणात न्यायालयाला केली आहे. न्यायालयाने गेल्या ४ नोव्हेंबर रोजी फडणवीस यांना समन्स बजावला होता. सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचून परत आलेल्या या प्रकरणाकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Devendra Fadnavis in JMFC court today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.