शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांना सोबत घेऊन करणार विकास : नवनियुक्त पालकमंत्री नितीन राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 22:33 IST

विकासाच्या प्रवाहात विरोधकांनादेखील सोबत घेण्यात येईल, असे मत राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले. पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी आपली भावना मांडली.

ठळक मुद्दे‘बुद्धिस्ट थीम पार्क’ साकारणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्न केले जातील. विशेषत: जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीची मिळकत वाढविण्यावर भर देण्यात येईल. सरकारी योजनांना सर्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. विकासाच्या प्रवाहात विरोधकांनादेखील सोबत घेण्यात येईल, असे मत राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले. पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी आपली भावना मांडली.नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी पर्यटन एक मोठे साधन होऊ शकते. ‘बुद्धिस्ट थीम पार्क’च्या संकल्पनेला साकार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. भारतात येणाऱ्या पर्यटकांपैकी ८० टक्के दक्षिण पूर्व आशियातील असतात. ‘बुद्धिस्ट थीम पार्क’ बनल्याने ते पर्यटक नागपूरकडे आकर्षित होतील. त्याचप्रमाणे गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या कामाला गती देऊन त्याला लवकरात लवकर सुरू करण्यावर भर असेल. यामुळे नागपूर शहराला एक मोठे केंद्र म्हणून विकसित करण्याकडे मोठे पाऊल पडेल, असे नितीन राऊत म्हणाले.नागपूर शहराला ‘वर्ल्ड क्लास’ शहर बनवून रोजगाराच्या नवीन संधी शोधण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येईल. ‘मिहान’मध्ये नवीन कंपन्या याव्यात व जिल्ह्यात उद्योगांना आकर्षित करण्यासाठी ‘रोड मॅप’ तयार होईल. नवीन उद्योग आल्यामुळे रोजगाराच्या संधी तर वाढतीलच शिवाय ‘जीडीपी’देखील वाढेल, असे त्यांनी सांगितले.नदी-तलावांवर विशेष लक्षगांधीसागर, सोनेगावसह शहरातील तलावांवर विशेष लक्ष देण्यात येईल. पिवळी नदी तसेच नागनदीच्या स्वच्छतेसंदर्भात थंड पडलेल्या योजनांना गती देण्यात येईल, असा दावादेखील नितीन राऊत यांनी केला.असाही योगायोग, ऊर्जामंत्र्यांनाच पालकमंत्रिपदमागील युती सरकारच्या कार्यकाळात ऊर्जामंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेच नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये ऊर्जामंत्रिपद नितीन राऊत यांच्यारुपाने परत नागपूर जिल्ह्याकडे आले. योगायोग म्हणजे परत एकदा ऊर्जामंत्र्यांकडेच जिल्ह्याचे पालकमंत्रिपददेखील आले. हा एक मोठा योगायोगच असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतguardian ministerपालक मंत्रीnagpurनागपूर