विकलेल्या भूखंडाच्या विकासाचा सौदा अंगलट

By Admin | Updated: December 23, 2016 01:52 IST2016-12-23T01:52:38+5:302016-12-23T01:52:38+5:30

विकलेल्या भूखंडांच्या विकासाचा (डेव्हलपमेंट) बिल्डरसोबत सौदा करून भूखंडमालक आणि भूविकासकाची फसवणूक करणाऱ्या एका महिलेसह

The development of the sale of the sale of the plot is over | विकलेल्या भूखंडाच्या विकासाचा सौदा अंगलट

विकलेल्या भूखंडाच्या विकासाचा सौदा अंगलट

बांधकाम ठरले वादग्रस्त : चौघांविरुद्धफसवणुकीचा गुन्हा दाखल
नागपूर : विकलेल्या भूखंडांच्या विकासाचा (डेव्हलपमेंट) बिल्डरसोबत सौदा करून भूखंडमालक आणि भूविकासकाची फसवणूक करणाऱ्या एका महिलेसह चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. क्रिष्णा गजभिये (महिला), प्रशांत गजभिये, सिद्धार्थ गजभिये आणि गौतम खोलूजी गजभिये (रा. वानाडोंगरी, मातोश्रीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांची एमआयडीसीतील मौजा वाघधरा येथे जमीन (खसरा क्रमांक १८/०४) आहे. या जमिनीतील एकूण ३२ हजार चौरस फुटाच्या जागेचा विकास करण्याचा उपरोक्त आरोपींनी ७३ लाखांमध्ये संदेश नारायण बुरबुरे यांच्यासोबत सौदा केला. त्यानुसार, बुरबुरेंनी नासुप्र तसेच अन्य ठिकाणी आवश्यक ती कागदपत्रे सादर करून आणि शुल्क भरून या जमिनीचा विकास केला. त्यावर बांधकामही केले. दरम्यान, ज्या भूखंडांवर हे बांधकाम करण्यात आले, ते भूखंड क्रमांक ८१ ते ८७ आपण उपरोक्त आरोपींकडून खरेदी केले असून, त्यापोटी ४५ लाख रुपये त्यांना दिले आहे, असा दावा करीत रेखाबाई जांभूळकर आणि अन्य काही जणांनी या बांधकामाला विरोध केला. त्यांनी सादर केलेली कागदपत्रेही खरी होती. त्यामुळे बांधकाम करणाऱ्या बुरबुरेंनी गजभिये परिवाराशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. प्रकरण वादग्रस्त ठरल्याचे लक्षात आल्यानंतर बुरबुरेंनी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
ठाणेदार सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार विजय नेमाडे यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर बुधवारी पीएसआय वानखेडे यांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला.(प्रतिनिधी)

भूखंड कसे परत मिळणार...?
जे भूखंड जांभूळकर आणि अन्य काहींच्या मालकीचे आहे, त्या भूखंडावर बांधकाम झाले आहे. हे बांधकाम बेकायदा ठरले आहे. त्यामुळे या बांधकामाचे काय होणार आणि ज्यांचे हे भूखंड आहे, त्यांना ते कसे परत मिळणार, असे प्रश्न संबंधितांमध्ये चर्चेला आले आहेत.

Web Title: The development of the sale of the sale of the plot is over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.