‘एज्युकेशन हब’मुळे नागपूरचा विकास

By Admin | Updated: August 11, 2015 03:52 IST2015-08-11T03:52:54+5:302015-08-11T03:52:54+5:30

पुण्याप्रमाणेच नागपुरातदेखील मोठ्या प्रमाणावर नामांकित शैक्षणिक संस्था आल्या आहेत. यामुळे येथील औद्योगिक

Development of Nagpur due to 'Education Hub' | ‘एज्युकेशन हब’मुळे नागपूरचा विकास

‘एज्युकेशन हब’मुळे नागपूरचा विकास

मुख्यमंत्री फडणवीस : कम्युनिकेशन हायवेसाठी अंबानी उत्सुक
नागपूर : पुण्याप्रमाणेच नागपुरातदेखील मोठ्या प्रमाणावर नामांकित शैक्षणिक संस्था आल्या आहेत. यामुळे येथील औद्योगिक विकासालादेखील चालना मिळेल व शहराचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर दौऱ्यावर आले असताना पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. संरक्षण क्षेत्रातील युनिट्सदेखील नागपुरात स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असेदेखील त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
‘एमआरओ’साठी दोन कंपन्या तयार
४नागपुरात ‘एमआरओ’ (मेन्टेनन्स, रिपेअर आणि ओव्हहॉल) स्थापन करण्यासाठी २ विमान कंपन्यांनी तयारी दाखवली असल्याची माहितीदेखील फडणवीस यांनी दिली. सध्या ‘बोईंग’सोबत यासंदर्भात चर्चा सुरू आहे. ‘बोईंग’ने नागपुरला ‘एमआरओ’ तयार केला होता व त्यानंतर याचे हस्तांतरण ‘एअर इंडिया’ला केले होते. सिंगापूर एअरलाईन्ससोबत हातमिळावणी करुन ‘एमआरओ’मध्ये परत येण्याचे ‘बोईंग’चे प्रयत्न सुरू आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कम्युनिकेशन हायवेसाठी अंबानी उत्सुक
४दरम्यान, नागपूर ते मुंबई दरम्यानच्या प्रस्तावित कम्युनिकेशन सूपर हायवेसाठी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपने उत्सुकता दाखवली आहे असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. हा हायवे अमरावती, औरंगाबादमार्गे जाणार आहे. ८०० किमी लांबीच्या रस्त्यावर ‘आॅप्टिक फायबर’ टाकण्यात येणार आहे. यामुळे वाहनांना वेग कायम राखणे शक्य होणार आहे. या प्रकल्पामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला ‘बूस्ट’ मिळेल आणि या मार्गावर ही सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ३० हजार कोटींचा प्रकल्प राबविण्यात येईल असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री करणार गोसीखुर्दचा दौरा
४दरम्यान मुख्यमंत्री स्वत: गोसीखुर्द प्रकल्पाचा दौरा करून त्याची पाहणी करणार आहेत. प्रलंबित सिंचन प्रकल्पांना वेग देण्यात येणार असल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
डहाणू बंदरामुळे मुंद्र्याला मिळणार आव्हान
४पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित डहाणू बंदरामुळे गुजरात येथील मुंद्रा बंदरातील जलवाहतुकीशी स्पर्धा निर्माण होणार आहे असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ‘जेएनपीटी’ व ‘महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड’ यांनी बंदर निर्मितीसंदर्भातील करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या बंदराची क्षमता १०० मिलीयन टनाची राहणार आहे. मुंद्रा येथील बंदराने १०० मिलीयन टनाची मर्यादा २०१४ सालीच ओलांडली होती व आजच्या तारखेत देशातील सर्वात मोठे बंदर आहे. मुंद्रा बंदर हे उद्योगपती गौतम अदानी यांच्या पुढाकारातून विकसित झाले आहे. डहाणू येथील बंदरदेखील ‘मल्टीकार्गो’ बंदर राहणार आहे. मोठी जहाजे येण्यासाठी येथे २० मीटरची नैसर्गिक कोरडी जागा आहे. या बंदराच्या उपयुक्ततेबाबत अंतर्गत अभ्यास पूर्ण झाला आहे. आज राज्यात केवळ ‘जेएनपीटी’ हे एकमेव मोठे बंदर आहे. नवीन बंदर हे ‘जेएनपीटी’ला पर्याय राहणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. या बंदरासाठी सहा हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून तीन वर्षांत याचे काम पूर्ण होईल. या बंदराची जागा ही डहाणू किनारपट्टीच्या उत्तरेकडे ४.५ नॉटिकल माईल्सवर आहे असेदेखील त्यांनी सांगितले. ७० टक्के मालवाहतूक ही जलमार्गाने होते. त्यामुळे तेथे बंदर निर्माण करण्याची आवश्यकता होती असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी या कामात पुढाकार घेतला असेदेखील ते म्हणाले.

Web Title: Development of Nagpur due to 'Education Hub'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.