गोरेवाडा प्रभागाचा विकास होणार

By Admin | Updated: August 29, 2014 01:03 IST2014-08-29T01:03:10+5:302014-08-29T01:03:10+5:30

आजवर विकासापासून दूर राहिलेल्या पश्चिम नागपुरातील गोरेवाडा प्रभाग हा आता विकासाच्या वाटेवर येत आहे. प्रभागातील दळणवळणाच्या समस्या लक्षात घेता वित्त व ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक

The development of the Gorevada division will be done | गोरेवाडा प्रभागाचा विकास होणार

गोरेवाडा प्रभागाचा विकास होणार

पावणेतीन कोटींची कामे : रस्ते, सिवरलाईन, पूल, डे्रनेज
नागपूर : आजवर विकासापासून दूर राहिलेल्या पश्चिम नागपुरातील गोरेवाडा प्रभाग हा आता विकासाच्या वाटेवर येत आहे. प्रभागातील दळणवळणाच्या समस्या लक्षात घेता वित्त व ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी रस्त्यांसह विविध विकास कामांसाठी २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतल्याने गोरेवाडा प्रभागाच्या विकासाला झळाळी प्राप्त होणार आहे़
उत्थाननगर येथील रस्त्याचे खडीकरण करण्यासाठी २६.५० लाख, फिरदोस कॉलनी, जाफर नगर येथील रहिम यांचे घरापासून अली यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण १० लाख, जाफर नगर जागृती कॉलनी व इतर ठिकाणी प्रकाश व्यवस्थेसाठी ३ लाख, सुरजनगर व बोधड ले-आऊट मधील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण ५० लाख, उत्थाननगर येथे सिवरलाईनचे बांधकाम १५ लाख, शशिकांत गृहनिर्माण सोसायटी येथील रस्त्याचे खडीकरण १० लाख, वेलकम सोसायटी येथील मशीद समोरील रस्ता, अयप्पानगर, समाजभुषण ले-आऊट मौजा झिंगाबाई टाकळी येथील रस्ता, काळबांडे नर्सिंग होम ते तिरुपती बँक पर्यंतचा रस्ता आणि नर्मदा व नटराज सोसायटीमधील स्मशान घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरणासाठी एकूण ४५ लाख रुपये निधी तर राठोड लॉन ते संगमनगर येथील नाल्यावर नवीन पुलाचे बांधकामासाठी ३५ लाख रुपये, गोसूल आझम मशीद येथे स्ट्रॉम डे्रनेज पाईप लाईन टाकण्यासाठी २८ लाख रुपये, उत्थाननगर येथील रस्त्याचे डांबरीकरण करणे १७ लाख, अशा सर्व कामांसाठी निधी मंजूर झाला असून ही कामे लवकरच सुरू होणार आहे़
यासह इंद्रायणी नगर, निवारा सोसायटी येथील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण, निवास को-आॅपरेटिव्ह सोसायटी ते रिंगरोड येथील नाल्यावर पुलाचे बांधकाम व याच नाल्यावर अप्रोच रोडचे बांधकाम एकतानगर येथे नाकाडे ते कुडेकर व लांडे यांचे घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे या सर्व कामांसाठी ४५ लाख रुपयांची तरतूद आमदार निधीतून करण्यात आली आहे़
गोरेवाडा प्रभागात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अंतर्गत बाह्य रस्त्यांच्या विकासामुळे येथील नागरिकांचा दळणवळण व वाहतुकीची समस्या लवकरच सुटणार आहे़ या विकास कामांच्या तत्परतेमुळे स्थानिक नागरिकांनी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचे भरभरून अभिनंदन केले यामध्ये घनश्याम मांगे, ईश्वर बरडे, गंगाप्रसाद ग्वालबन्सी, नितीश ग्वालबन्सी, इंदूताई पुंड, ओवेस कादरी, मीना बरडे, मुकीम खान, सोहेल पटेल, वीरेंद्र शुक्ला, सय्यद फजल उल्लाह, चतुर्वेदी, प्रीती शुक्ला, सुरेश सुराणा, जावेद परवेज खान, हाजी मो. इजराईल शेख, अंजली आत्राम, एॅडविन फ्रान्सिस, पास्कल तांबे, अविनाश पाटील, बबलू शेख, जावेद खान, सुरेश काळबांडे, देवराव रंगारी, इंद्रसेन ठाकूर, रामेश्वर खडसे, रामभाऊ कळंबे यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी मुळक यांचे आभार मानले.(प्रतिनिधी)

Web Title: The development of the Gorevada division will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.